RBI Rule : वेळेत कर्जाचा ईएमआय भरता आला नाही? काळजी करू नका, आरबीआयचा ‘हा’ नियम करेल तुमची मदत

RBI Rule : अनेकजण कर्ज घेतात. पण काहीजणांना वेळेत कर्जाचा ईएमआय भरता येत नाही. अशावेळी कर्ज घेणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची मोठी शक्यता असते. जर तुम्हालाही कर्जाचा ईएमआय भरता आला नाही तर काळजी करू नका, आरबीआयचा नियम तुमची मदत करेल.

जाणून घ्या महत्त्वाचा नियम

हे लक्षात घ्या की ‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड’ (CIBIL) लोकांच्या कर्ज किंवा क्रेडिट कार्ड खर्च करण्याच्या सवयींवर लक्ष ठेवून असते. एका अहवालात असे म्हटले आहे की, दिवसेंदिवस लोकांमध्ये असुरक्षित कर्ज घेण्याची सवय वाढत चालली आहे. कोविडपूर्व पातळीपासून वैयक्तिक कर्जात देखील झपाट्याने वाढ झाली आहे.

उदाहरणार्थ, तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे, पण तुम्ही काही कारणास्तव ते परत करू शकला नाही. त्यामुळे तुम्ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्जाची पुनर्रचना करता येईल.इतकेच नाही तर तुम्हाला नंतर 5 लाख रुपये द्यावे लागतील आणि उर्वरित 5 लाख रुपये दीर्घ कालावधीसाठी हळूहळू भरता येतील. यामुळे तुमच्यावरील EMI चा दबाव कमी होऊ शकतो.

होईल मोठा फायदा

हे लक्षात घ्या की लोकांसाठी कर्जाची पुनर्रचना करणे हा एक चांगला पर्याय असून ते त्यांच्याकडून कर्ज चुकवण्याचा टॅग काढून टाकण्यास मदत करते. ज्यावेळी एखादी व्यक्ती कर्ज थकबाकीदार बनते त्यावेळी त्याचा क्रेडिट इतिहास खराब होत जातो.

असे झाले तर तुमचा CIBIL स्कोअरही कमी होऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज घेण्याचा मार्ग बंद होईल. त्यामुळे कर्ज देण्यापूर्वी कोणतीही बँक तुमचा CIBIL स्कोर एकदा तपासत असते. तो त्याच्या मानकांनुसार असेल तरच कर्ज मंजूर केले जाते. नाहीतर कर्जाची रक्कम नाकारली जाते.

Leave a Comment