RBI News: RBI ने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकेवर कारवाई केली आहे.RBI ने मिझोराम ग्रामीण बँक आणि त्रिपुरा ग्रामीण बँक या दोन्ही बँकांवर कारवाई केली आहे. काही दिवसापूर्वी कॅनरा बँकेला 2.92 कोटी रुपयांचा दंड RBI ने ठोठावला होता.
RBI ने मिझोराम ग्रामीण बँकेला 5 लाख रुपये आणि त्रिपुरा ग्रामीण बँकेला 2 लाख रुपये दंड ठोठावला आहे.
RBI च्या म्हणण्यानुसार, दोन्ही बँका काही कर्ज खात्यांना उत्पन्न ओळख आणि मालमत्ता वर्गीकरण (IRAC) नियमांनुसार नॉन-परफॉर्मिंग म्हणून वर्गीकृत करण्यात अयशस्वी ठरल्या. त्यानंतर मध्यवर्ती बँकेने बँकांना योग्य कारणे देण्याबाबत नोटीस बजावली होती. ‘सूचना न पाळल्याबद्दल दंड का ठोठावला जाऊ नये ?’, असा सवालही त्यांना करण्यात आला.
नोटिसीला बँकांच्या प्रतिसादासह वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेल्या तोंडी सबमिशनचा आढावा घेतल्यानंतर, RBI ने त्यांच्यावरील आरोप प्रमाणित करताना आर्थिक दंड आकारण्याचा निर्णय घेतला.