RBI Guidelines : RBI ने एक मोठे अपडेट जारी केले आहे. या अपडेटनुसार वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड घेणे मुश्किल होणार असल्याची माहिती आहे. काय आहे यामागचे कारण जाणून घ्या.
RBIने कोणते नियम केले कडक?
RBI ने बँकांच्या असुरक्षित कर्जाबाबत एक प्रकाशन जारी केले असून ज्यात असे म्हटले आहे की आता बँका आणि बिगर बँकिंग कंपन्यांना असुरक्षित कर्ज पोर्टफोलिओसाठी अधिक भांडवल बाजूला ठेवावे लागेल.
हे भांडवल पूर्वीपेक्षा 25 टक्के जास्त असेल. यापूर्वी 100 टक्के भांडवल वेगळे ठेवले जायचे पण आता बँका आणि बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांना 125 टक्के भांडवल वेगळे ठेवावे लागणार आहे. समजा एखाद्या बँकेने 5 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज दिल्यास आधी फक्त 5 लाख रुपये बाजूला ठेवावे लागतील, परंतु आता बँकेला 25 टक्के जास्त म्हणजे 6 लाख 25 हजार रुपये बाजूला ठेवावे लागणार आहे.
जाणून घ्या यामागचे कारण
अलीकडच्या काळात वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डमध्ये झपाट्याने वाढ झाली असून मागील वर्षी, असुरक्षित कर्जांनी बँकेच्या कर्जाच्या वाढीला मोठ्या फरकाने मागे टाकले. क्रेडिट आणि वैयक्तिक कर्जामध्ये असामान्य वाढ दिसली. वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डची संख्या वाढली असताना, डिफॉल्टची अधिक प्रकरणे समोर आली असून वेळेवर पैसे भरण्याची प्रकरणे कमी झाली आहेत. त्यामुळे आरबीआयने या प्रकारच्या कर्जाचे नियम कडक केले आहेत.
ग्राहकांवर होईल परिणाम
आरबीआयच्या या कर्ज नियमामुळे बँका आणि बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांना अधिक भांडवल वेगळे ठेवावे लागेल. याचा असा अर्थ बँका आणि बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांकडे असुरक्षित कर्जासाठी कमी पैसे शिल्लक राहतील. ग्राहकांना अशी कर्जे घेताना अडचणी येतील. बँका आणि एबीएफसीही यासाठी काही निकष लावू शकतात.
कोणत्या प्रकारच्या कर्जावर हा नियम लागू होणार नाही. साधारणपणे सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज असा दोन प्रकारची कर्जे असतात. असुरक्षित कर्जामध्ये वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांचा समावेश होतो आणि सुरक्षित कर्जामध्ये गृह कर्ज, कार कर्ज, सुवर्ण कर्ज आणि मालमत्ता कर्ज इत्यादींचा समावेश होतो. अशी कर्जे सुरक्षित केली जातात कारण त्या बदल्यात बँकांकडे काहीतरी किंवा दुसरे ठेवले जाते. हे लक्षात घ्या की आरबीआयच्या या नियमाचा सुरक्षित कर्जावर परिणाम होणार नाही.