RBI Bank News: देशाची सर्वात मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने शुक्रवारी एक मोठी घोषणा केली आहे. RBI ने 2000 रुपयांची नोट मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या नोटा अवैध ठरणार नाहीत. पण 30 सप्टेंबर 2023 नंतर 2000 ची नोट पूर्णपणे बंद होणार
2 हजाराची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये बाजारात आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या होत्या. त्याऐवजी नव्या पॅटर्नमध्ये 500 आणि 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. RBI ने 2018-19 पासून 2000 च्या नोटांची छपाई बंद केली आहे.
2000 च्या नोटा बदलण्याच्या सूचना
आरबीआयने बँकांना 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत 2000 च्या नोटा बदलण्याचे निर्देश दिले आहेत. एका वेळी जास्तीत जास्त वीस हजार रुपयांच्या नोटा बदलल्या जातील. यापुढे बँका 2000 च्या नोटा जारी करणार नाहीत.