RBI । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता बँकेचा परवाना रद्द केला आहे. अशा परिस्थितीत बँकेकडून ठेव स्वीकारली जाणार नसून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे ग्राहकांना फटका बसणार का? असा सवाल ग्राहक करत आहेत.
जाणून घ्या परवाना रद्द करण्याचे कारण?
भारतीय रिझर्व्ह बँकेने महाभैरब सहकारी अर्बन बँकेचा परवाना रद्द केला असून याबाबत आरबीआयचे म्हणणे आहे की, बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि त्यातून कमाईची क्षमतादेखील कमी आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या बँकेचा परवाना रद्द केला गेला आहे.
ग्राहकांवर होणार परिणाम?
हे लक्षात घ्या की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवाना रद्द केल्यामुळे, बँका त्यांच्या विद्यमान ठेवीदारांना पूर्ण पेमेंट करू शकणार नाहीत. बँक उघडे ठेवणे ठेवीदारांसाठीही चांगले नाही. जमा केलेली रक्कम एका मर्यादेपर्यंत काढण्याची सुविधा देण्यात येत आहे. डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) आणि डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (DICGC) कडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर ग्राहकांना विमा दाव्याची रक्कम मिळू शकते. बँकेचा परवाना रद्द झाला तर ग्राहकांना अडचणी येऊ शकतात.
महाभैरब कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या मतानुसार, सुमारे 99.8% ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून मिळेल. DICGC ने 13 जून 2024 पर्यंत एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 20.03 कोटी रुपये भरले असून भारतीय रिझव्ह बँकेकडून सहकारी बँकांचे पुनरावलोकन केले जाते, त्यानंतर खराब आर्थिक स्थिती किंवा नियामक उल्लंघनामुळे बँकांचा परवाना रद्द करण्यात येतो.