RBI : आरबीआयची मोठी कारवाई! ‘या’ बँकेचा केला परवाना रद्द; ग्राहकांना बसला आर्थिक फटका

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने पुन्हा एकदा एक बँकेवर कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या कारवाईचा आता ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. RBI ने या बँकेचा परवाना रद्द केला आहे.

जाणून घ्या परवाना रद्द करण्याचे कारण

कमाईची क्षमता आणि पुरेसे भांडवल नसल्याने RBI ने शहर सहकारी बँक, महाराष्ट्रचा परवाना देखील रद्द केला आहे. यासह, सेंट्रल बँकेने सहकारी संस्थांच्या निबंधकांना बँकेचे कामकाज थांबवण्याचे आणि लिक्विडेटर नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्व व्यवहार झाले बंद

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने आपल्या आदेशातअसेही सांगितले की या सहकारी बँकेचे सर्व काम 19 जून 2024 पासून बंद करण्यात आले आहे.

बँक ग्राहकांचे काय होणार?

सेंट्रल बँकेच्या आदेशानुसार ठेवीदारांना त्यांचे भांडवल परत मिळणार असून डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत, तुम्ही फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करू शकता. बँकेच्या सुमारे 87 टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची पूर्ण रक्कम मिळणार आहे. तर 14 जून 2024 पर्यंत, DICGC ने एकूण विम्याच्या रकमेपैकी 230.99 कोटी रुपये अगोदरच भरले आहेत.

आरबीआयचे असे मत आहे की या बँकेकडे आता कमाईची क्षमता नाही. सध्याच्या स्थितीत, बँक ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही किंवा इतर आर्थिक कामे करू शकणार नसून बँकांना त्यांचे कामकाज चालू ठेवण्याची परवानगी दिली तर त्याचा ग्राहकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर आरबीआयच्या आदेशानंतर आता बँका ना ठेवी स्वीकारू शकणार आहेत आणि ना कुणाला कर्ज देऊ शकणार आहेत. काही काळापूर्वी सेंट्रल बँकेने दुसऱ्या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता.

Leave a Comment