RBI Action: देशाची सर्वात मोठी बँक RBI ने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत एका बँकेला तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
RBI ने दिलेल्या माहितीनुसार RBI ने इचलकरांची येथील कोहिनूर सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 46 (4) i, 56 आणि कलम 47 A (1) (c) अंतर्गत बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, बँकेने गुंतवणुकीतून काही नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेने केलेल्या वैधानिक तपासणीत असे दिसून आले की कोहिनूर को-ऑपरेटिव्ह बँक प्रुडेंशियल इंटर-बँक ग्रॉस एक्सपोजर मर्यादा आणि इंटर बँक काउंटर पार्टी लिमिटच्या निर्देशांचे पालन करत नाही.
तपासणी अहवालानंतर आरबीआयने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली, “त्यांना दंड का लागू करू नये?” बँकेच्या प्रतिसादानंतरच सेंट्रल बँकेने दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी, RBI ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 84.50 रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय अनेक सहकारी बँकांना नुकताच दंडही ठोठावण्यात आला आहे.