Raver Lok Sabha | नाराजी उफाळली! शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; रावेरात नेमकं काय घडलं?

Raver Lok Sabha Election : रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत (Raver Lok Sabha Election) धुसफूस वाढली आहे. या मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना (Raksha Khadse) पुन्हा उमेदवारी दिली आहे तर रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवार गटाने श्रीराम पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. श्रीराम पाटील हे उद्योजक आहेत. त्यांच्या उमेदवारीनंतर रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत होणार आहे.

परंतु त्यांच्या उमेदवारीनंतर आता रावेर मतदारसंघात नाराजी नाट्य समोर आले आहे. शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. या घटनेमुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. माजी आमदार संतोष चौधरी हे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते मात्र त्यांना डावलून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली गेल्याने नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे.

Election Commission : घडलाय भलताच प्रकार..! म्हणून निवडणूक आयोगाने चक्क CM ऑफिसलाच धाडली नोटीस

Raver Lok Sabha

माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी दिली नाही परंतु ऐनवेळी पक्षात आलेल्या श्रीराम पाटील यांना संधी दिली. यामुळे भुसावळ, वरणगाव, रावेर, यावल या तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी नाराज होते. अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता यानंतर संतोष चौधरी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, महायुतीने या मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा तिकीट दिले आहे. रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांपैकी एकाला उमेदवारी दिली जाईल असे अगोदर सांगितले जात होते. परंतु एकनाथ खडसे यांनी आजारपणाचे कारण देत निवडणूक लढण्यास नकार दिला. रोहिणी खडसे यांनी देखील निवडणूक लढण्यास नकार दिला. आतातर एकनाथ खडसे यांची भाजपवापसी निश्चित झाली आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या होत्या.

Lok Sabha Election : मोठी बातमी! हिंगोलीत हेमंत पाटलांचं तिकीट कट; यवतमाळमध्येही नवा चेहरा

Raver Lok Sabha

या मतदारसंघात नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाईल याची उत्सुकता कायम होती. उमेदवार शोधण्यात कसरत होत असल्याने रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होत नव्हता. अखेर दोन दिवसांपूर्वी शरद पवार गटाने येथील उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीनंतर महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, पदाधिकारी एकदिलाने काम करतील अशी अपेक्षा होती. परंतु नवे नाराजी नाट्य समोर आल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. आता ही नाराजी कशा पद्धतीने दूर केली जाणार? महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते संभाव्य डॅमेज कंट्रोल टाळण्यासाठी काय उपाययोजना राबविणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment