BJP Announced Narayan Rane Candidate for Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency : राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी मैदान तयार होत आहे. महायुतीकडून जागावाटप आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. परंतु यावेळी अनेक (Ratnagiri Sindhudurg) मतदारसंघात मोठा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे जागावाटपात अडचणी निर्माण झाल्या आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातही असाच तिढा निर्माण झाला होता. या मतदारसंघावर शिंदे गट आणि भाजपने दावा ठोकला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यासाठी शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा केला होता तर भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या मतदारसंघातून निवडणुकीत उतरवण्यास तयार होता.
त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी कुणाला द्यायची असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आज अखेर या मतदारसंघातील तिढा मिटला आहे. भारतीय जनता पार्टीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत या मतदारसंघातून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
Madha Lok Sabha | माढ्यात ट्विस्ट! मोहितेंनी ‘तुतारी’ घेताच नाराजी उफाळली, युवा नेता अपक्ष लढणार?
Ratnagiri Sindhudurg
उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत किरण सामंत यांनी माघार घेतली असल्याचे जाहीर करताच रत्नागिरी नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. या मतदारसंघात मागील अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी केली होती. वेळप्रसंगी बंडखोरी करण्याची ही त्यांनी तयारी केली होती. याआधी त्यांनी तसे संकेतही दिले होते तर दुसरीकडे भाजपही हा मतदारसंघ सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी हा मतदारसंघ भाजपला हवा होता त्यामुळे उमेदवारी बाबत निर्णय घेता येत नव्हता.
महायुतीच्या नेत्यांमध्ये अनेक वेळा बैठका झाल्या परंतु समाधानकारक निर्णय घेतला जात नव्हता. दोन्हीही पक्षातील नेत्यांकडून मतदारसंघावर दावा कायम ठेवला जात होता. परंतु आज अखेर भाजपने बाजी मारली. नारायण राणे यांच्यासाठी हा मतदारसंघ शिंदे गटाकडून सोडवून घेतला. किरण सामंत यांना आज ना उद्या खासदार करायचे हे निश्चित आहे त्यामुळे आज जो काही तिढा निर्माण झाला होता. तो सोडवण्यासाठी किरण सामंत यांनी स्वतः पुढाकार घेतला अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Ratnagiri Sindhudurg