Ration Card : घरबसल्या सोप्या पद्धतीने बनवा रेशनकार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ration Card : रेशनकार्ड खूप गरजेचे आहे. अनेक सरकारी कामांमध्ये रेशनकार्डची आपल्याला गरज पडते. जर आपल्याकडे रेशनकार्ड नसेल तर अनेक कामे अडकून पडतात. रेशनकार्ड काढण्यासाठी पूर्वी अनेक हेलपाटे कार्यालयात मारावे लागायचे. पण तुम्ही आता हे घरबसल्या काढू शकता.

तुम्हाला आता तुम्हाला रेशन कार्ड बनवण्यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज नाही. कारण आता तुम्हाला घरबसल्या रेशनकार्ड मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. कसे ते जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

रेशन कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

समजा तुम्ही रेशन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करत असाल तर त्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असायला हवीत.

  • मतदार ओळखपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • एलपीजी गॅस कनेक्शन पास बुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी

असा करा शिधापत्रिकेसाठी अर्ज

ऑनलाइन रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला राज्याच्या अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. उदाहरणार्थ, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्यास, तुम्हाला महाराष्ट्र अन्न आणि रसद विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. तेथून तुम्हाला रेशन कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

पण हे लक्षात ठेवा की रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, तुम्हाला सुमारे 30 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण यादरम्यान तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून इतर महत्त्वाच्या माहितीची अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाईल. तुमची सर्व माहिती बरोबर असेल तर तुमचे ४५ दिवसांत रेशन कार्ड तयार होईल.

Leave a Comment