Rates of CNG PNG । सर्वसामान्यांना महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीचे वाढले दर, जाणून घ्या

Rates of CNG PNG । सर्वसामान्य जनतेला सतत महागाईचा धक्का सहन करावा लागतो. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावी लागते. अशातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

मागील काही दिवसांपासून सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे आता अगोदरच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखी महागाईचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागेल.

काल रात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू झाले आहेत. सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी आणि पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ झाली आहे. मुंबईत सीएनजी-पीएनजी गॅस पुरवणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी काल रात्रीपासून नवे दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएनजीच्या दरामध्ये दीड रुपयांनी वाढ झाली असल्याने आता मुंबईकरांना एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार असून पीएनजीचा दर ४७ रुपयांवरून ४८ रुपये झाला आहे.

सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ झाली असल्यामुळे आता मुंबईतील वाहनधारकांना याचा मोठा फटका बसला आहे. आता सीएनजीच्या खरेदीसाठी वाहनधारकांना जास्त पैसे मोजावे लागेल. सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास महाग होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment