Rate Hike : बँक ऑफ इंग्लंडने (Bank of England) गुरुवारी मूळ व्याजदर (Interest rate) ०.७५ टक्क्यांनी वाढवून तीन टक्क्यांवर नेला. तीन दशकांहून अधिक काळातील ही सर्वात मोठी वाढ आहे. व्याजदर वाढीबाबत बँक ऑफ इंग्लंडने म्हटले आहे की, ब्रिटन (Britain) आधीच मंदीचा (Recession) सामना करत आहे आणि तो दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे.
- IPO Breaking : या दोन कंपन्यांची आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात एंट्री
- Paint stock Prices : म्हणून “या” शेअर्सची किंमत १३ टक्क्यांनी वाढली
- Digital Currency : बापरे… पहिल्या दिवशीच ४८ सौद्यांमध्ये (Deals) २७५ कोटी रुपयांचे व्यवहार (transation)
- SEBI News : म्हणून ८२ कंपन्यांना २२.६४ कोटींचा दंड : ४५ दिवसांत दंड भरायची सेबीची सक्ती
केंद्रीय बँकेने (Central bank) येत्या काही वर्षांत उच्च महागाई आणि बेरोजगारीच्या (High inflation and unemployment) दरांसह ब्रिटिश अर्थव्यवस्थेत (British Economy) दीर्घकाळ संकुचित होण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये नोंदी होऊ लागल्यापासून सलग आठ तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात (Gross Domestic Product – GDP) घट झाली आहे. तथापि, बँक ऑफ इंग्लंडने असेही म्हटले आहे, की त्याचा प्रभाव २००८-०९ आणि १९८० च्या दशकातील मंदीच्या तुलनेत कमी आहे.
रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukaine) केलेले आक्रमण आणि माजी पंतप्रधान लिझ ट्रस (Former Prime Minister Liz Truss) यांच्या अलीकडील विनाशकारी (destructive) आर्थिक धोरणांनंतर (Fiscal Policy) वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेने निर्णय घेतला आहे.
बँक ऑफ इंग्लंडचा प्रमुख व्याजदर आता ०.७५ टक्क्यांनी वाढून ३ टक्के झाला आहे. दरम्यान, बँक ऑफ इंग्लंडने सलग आठव्यांदा व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. यावरून असे दिसून येते की, इंग्लंडमध्ये (England) महागाईचे संकट (Inflation crisis) खूप मोठे आहे. केंद्रीय बँक (Central bank) आणि सरकारचे (Government) सर्व प्रयत्न करूनही लोकांना महागाईपासून दिलासा मिळत नाही. ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषी सुनक (Prime minister Rishi Sunak) यांच्यासाठी हे सर्वात मोठे आव्हान आहे.