नागपूर : बिबट्याचा हल्ला ही आता नेहमीच येणारी बातमी आहे. निसर्ग आणि मानव यांच्या संघर्षाची ही खुणगाठ आहे. या दुर्दैवी हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, निसर्गाची अद्भुत कमाल तरीही मनमोहक असल्याने मानवाला आपल्याकडे खेचत असते. आता ताडोबाच्या जंगलातही काळा बिबट्या सापडला आहे. त्याचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
Hiding between the dense forest of Tadoba, resides this semi melanistic (black) leopard like a balck ghost roaming the jungle.
ताडोबाच्या घनदाट जंगलांमध्ये दडून बसलेल्या काळ्या बिबट्याचे हे दृश्य.
Credit- swethakumarrangaraobobbili (Instagram) pic.twitter.com/4XyeB7Bngd
— Maharashtra Tourism (@maha_tourism) July 1, 2021
काळा बिबट्या ही वेगळी जात नसून मार्जार कुळातील बिबट्याचाच हा प्रकार आहे. कातडीच्या रंगामुळे त्याच्या अंगावरचे ठिपके लपतात. वाघांमध्ये पांढरा वाघ जसा दुर्मिळ, तसाच बिबट्यात काळा बिबट्याही दुर्मिळ आहे. त्याच्या कातडीचा रंग त्वचेतील ‘मेलनिन’ या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. काळा बिबट्या हा तसा खूपच दुर्मिळ प्राणी आहे. अनेकांना असा काळ्या रंगाचा बिबट्या असतो यावरही विश्वास बसत नाही. मात्र, असा बिबट्या ताडोबाच्या जंगलात आहे. मागील दीड वर्षात अनेकांना त्याने दर्शन दिलेले आहे.
त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या ट्विटर खात्यावर याचे दोन फोटो शेअर केलेले आहे. हा बिबट्या असल्याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कारण, बिबट्या म्हणजे पिवळ्या रंगावर काळे ठिबके असेच चित्र सामान्यपणे पुढे येते. मात्र, निसर्गाचा अद्भुत अविष्कार म्हणूनच या काळ्या बिबट्याला ओळखले जाते. अनेकांना हा बिबट्या दिसणे हेही भाग्य वाटते.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.