Rajya Sabha Elections : राज्यसभेच्या ‘त्या’ उमेदवाराचा अर्ज बाद; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Rajya Sabha Elections : राज्यात सगळीकडे निवडणुकांची तयारी सुरु आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) राज्यसभा निवडणुका (Rajya Sabha Elections) पार पडणार असून राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. अशातच आता राज्यात निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यसभेच्या सात उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला आहे. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणुक बिनविरोध होणार आहे. राज्यसभा (Rajya Sabha Elections) उमेदवारांकडे 20 फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. त्यापूर्वी निवडणुकीसाठी दाखल झालेला अपक्ष उमेदवाराचा सातवा अर्ज छाननीत बाद झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

हे आहेत राज्यसभेचे उमेदवार

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून (BJP Candidate in Maharashtra) अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे या तिघांनी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेकडून (Shivseva Candidate) मिलिंद देवरा, राष्ट्रवादीकडून (Rashtravadi Congress Party) प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून (Congress) चंद्रकांत हांडोरे यांनी अर्ज दाखल केले. त्याशिवाय अपक्ष म्हणून विश्वास जगताप यांनी अर्ज केला होता. पण या निवडणुकांसाठी सूचक, अनुमोदक म्हणून आमदारांच्या सह्यांची पुर्तता जगताप यांना करता न आल्याने त्यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आला आहे.

त्यामुळे आता राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध होणार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आता भाजपच्या तीन आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एक अशा सहा उमेदवारांची बिनविरोध निवड जवळपास झाली आहे. एका उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या तीनच दिवसात याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या गटाने उमेदवार दिला नव्हता. पण राज्यसभेचा उमेदवारी देताना महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट अजित पवार यांनी इतर पक्षांना धक्का देत राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडतील. त्याकडे मात्र सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Comment