Rajasthan Politics : राजस्थानचे राजकारण (Rajashthan Politics) माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या जनसंघर्ष यात्रेच्या समारोपावेळी गेहलोत सरकारमधील मंत्री राजेंद्र गुढा, हेमाराम चौधरी यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर सडकून टीका केली.
सैनिक कल्याण मंत्री राजेंद्र गुडा म्हणाले की, राजस्थान सरकार कर्नाटकच्या ४० टक्के कमिशनच्या वर जात आहे. भ्रष्टाचाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पायलट आमचे नेते आहेत, जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू आणि 2023 चा निर्णय जनता घेईल. सरकार अडचणीत असताना भाजपाच्या आमदारांना कसे विकत घेतले, याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा त्यांनी केला.
शांती धारीवाल यांच्यावर हल्ला करताना गुढा म्हणाले की, भरत सिंह पत्रांमागून पत्र लिहित आहेत. भ्रष्टाचार केला जात आहे. गेहलोत यांनी भल्याभल्यांना पाणी पाजले. त्यामुळे धारिवाल यांनी राजस्थानच्या तहानलेल्या लोकांना पाणी द्यावे. धारिवाल कार्यालयातून एकही फाईल पैशांशिवाय बाहेर पडत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
मंत्री हेमाराम चौधरी यांनी सीएम गेहलोत (Ashok Gehlot) यांच्यावर प्रश्न उपस्थित केला. ‘मी भ्रष्ट आहे तर तुम्ही मला मंत्रिपदावरून का काढत नाही, मला मंत्री राहायचे नाही, आमच्यावर करोडो रुपये घेतल्याचा आरोप आहे, मग का? आपण मंत्री म्हणून बसायचे का? आमच्याच सरकारवर आरोप. जो मुख्यमंत्र्यांकडे जातो तो सावकार होतो आणि जो जात नाही तो बेईमान होतो, असे चौधरी म्हणाले.
आमदार मुकेश भाकर म्हणाले की, पायलट आणि आमदारांना टार्गेट केले जात आहे.
आमदार वेदप्रकाश सोळंकी म्हणाले की, प्रभारी सुखजिंदर रंधवा यांनी मला सर्व्हे दाखवून भाजप चाकसूमध्ये बोलत असल्याचे सांगितले. मी त्यांना म्हणालो की, माझ्या जागी भाजप बोलत आहे, पण निदान मला तरी सांगा की काँग्रेस कुठे बोलत आहे? पायलटच्या चेहऱ्यावर आपण आमदार झालो आहोत, असे ते म्हणाले.
आमदार वेदप्रकाश सोळंकी म्हणाले की, प्रभारी सुखजिंदर रंधवा यांनी मला सर्व्हे दाखवून भाजप बोलत असल्याचे सांगितले. मी त्यांना म्हणालो की, माझ्या जागी भाजप बोलत आहे, पण निदान मला तरी सांगा की काँग्रेस कुठे बोलत आहे? पायलटच्या चेहऱ्यावर आपण आमदार झालो आहोत, असे ते म्हणाले.