Raj Thackeray । निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा दिलासा 16 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून सुटका, नेमकं प्रकरण काय?

Raj Thackeray । लोकसभेनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेनंतर आता अवघ्या काही महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडीकडून पराभव सहन करावा लागला होता. पराभवामुळे आता महायुती आगामी निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच तयारीला लागली आहे.

अशातच आता राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. न्यायालयाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 16 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून मुक्तता केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या खटल्यात त्यांना दोन वेळा वारंट बजावले होते. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयाकडून हा निकाल देण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मनसेकडून 2008 मध्ये शेंडगेवाडी येथे रेल्वे भरतीच्या मुद्यावरुन आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाकडून दोन वेळा अजामीन पत्र वॉरंट बजावला होता. आता या गुन्ह्यातून राज ठाकरे यांची मुक्तता झाली आहे. याबाबत मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, अजमीनपत्र वारंट रद्द करण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने तो वारंट रद्द केला होता. महाराष्ट्रात रेल्वेत भरती होत असताना परप्रांतीय उमेदवारांची निवड होते. रेल्वेच्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रात न देता इतर राज्यात दिल्या जातात, असा आरोप करत सन 2008 साली मनसेने आंदोलन केले होते. त्यावेळी मनसेने हे आंदोलन चांगलेच गाजले होते.

Leave a Comment