Business : सध्या पावसाचे दिवस आहेत. या दिवसात चालणारे काही व्यवसाय (Business) करून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यवसायांची माहिती देणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकता. छत्री आणि रेन कोटच्या व्यवसायाबद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहे की पावसाळ्यात या व्यवसायातून सर्वाधिक नफा मिळतो. परंतु आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही पावसाळ्यात (Rain) सहज करू शकता. तुमच्या बजेटनुसार सुरुवात करा आणि चांगली रक्कम कमवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या अशाच काही पावसाळी व्यवसायांबद्दल जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
वॉटरप्रूफ बॅग
वॉटरप्रूफ बॅगची (Waterproof Bag) मागणी वर्षभर बाजारात राहत असली तरी पावसाळ्यात या बॅगची सर्वाधिक मागणी असते. कार्यालयात जाणारे असोत की शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्वच जण वॉटरप्रूफ बॅग घेतात. जेणेकरून महत्वाच्या वस्तू पाण्यापासून सुरक्षित राहतील. अशा परिस्थितीत जर तुम्ही हा व्यवसाय केला तर तो तुमच्यासाठी फायदेशीर व्यवसाय असेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याचीही गरज नाही. वॉटरप्रूफ बॅग दुकान बाजाराच्या अशा ठिकाणी असावे, जेथे पिशव्यांची मागणी असेल.
ताडपत्री व्यवसाय
पावसाळ्यात हा व्यवसाय सर्वाधिक चालतो. तुम्ही सर्वांनी अनेकदा पाहिलं असेल की पावसाळ्यात लोक आपल्या घरासमोर, दुकानासमोर किंवा छतावर ताडपत्री टाकतात जेणेकरून ते पावसापासून संरक्षण होईल. जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा प्रत्येकाला संरक्षणासाठी ताडपत्री लागते. आजच्या काळातही गावात ताडपत्री आवश्यक आहे, त्यामुळे पावसाळ्यात गावात ताडपत्री व्यवसाय सुरू केला तर चांगली कमाई होऊ शकते.
कार साफसफाईचा व्यवसाय
हा व्यवसाय पावसाळ्यात सर्वात फायदेशीर व्यवसाय आहे. कारण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च आणि मेहनत करण्याचीही गरज नाही. अगदी कमी भांडवलात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. पावसाळ्यात वाहने लवकर खराब होतात. त्यामुळे वाहने स्वच्छ (Vehicle Cleaning) करण्यासाठी लोक वॉशिंग सेंटरवर येतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केलात तर तुम्हाला चांगले पैसे मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त 5 ते 10 हजार रुपये खर्च करावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही दरमहा किमान 15 हजार रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करू शकता.