मुंबई : राज्यात आता उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. विदर्भात तर उष्णतेची लाटच आलीय. पण, आता उन्हाच्या झळा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. कारण, राज्यात पावसाचं आगमन होणार आहे. येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात ठिकठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची (Maharashtra Rain Alert) शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
होळीनंतर राज्यात तापमानाचा पारा अचानक वाढला.. राज्याच्या अनेक भागात 42 अंशाच्या वर तापमान गेलंय.. पूर्ण मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवला. राजस्थानासह काही राज्यात उष्णतेची लाट आलीय. गेल्या 29 एप्रिलपासून 2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम होती. अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलडाणा जिल्ह्यांतील नागरिकांना उन्हाच्या सर्वाधिक झळा बसल्या. पण, आता नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. आज सायंकाळपर्यंत राज्यात जोरदार वाऱ्यासह पावासाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या जिल्ह्यात पावसाची शक्यता..
येत्या 5 एप्रिलला कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापुरात दमदार पावसाचा अंदाज आहे.. हवामान विभागाने या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे.. तसेच, 6 एप्रिललाही या चारही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून, सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांना देखील उकड्यापासून दिलासा मिळणार आहे.
अवकाळी पावसामुुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.. राज्यातील वातावरण पुढील चार दिवस ढगाळ राहणार असल्याने कडक उन्हापासून नागरिकांची काही अंशी सुटका होणार आहे..
‘त्यामध्ये’ ही जिओनेच मारलीय बाजी; एअरटेलला मात्र जमलेच नाही; पहा, लहान प्लानचा काय आहे फायदा..
मोठी बातमी..! आजपासून ‘या’ राज्यात दुप्पट जिल्हे; एकाच वेळी 13 नवे जिल्हे आलेत अस्तित्वात..