Rainfall Alert । राज्याला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका; ‘या’ जिल्ह्यात शाळा, कॉलेजही राहणार बंद

Rainfall Alert । राज्याच्या भागांना यंदा पावसाने चांगलेच झोडपून काढायला सुरुवात केली आहे. दमदार पावसामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ठिकाणी पेरण्यांची लगबग सुरु झाली आहे. अशातच आता हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे.

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तर रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर आणि माणगाव या तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना सोमवारी १५ जुलैला सुट्टी जाहीर केली आहे. याबाबत रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश दिले आहेत.

प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत संपूर्ण जिल्ह्याकरिता किंवा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना प्रदान केले आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असून संदर्भ क. २ कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान केले असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार १४ जुलैला रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. वरील सर्व बाबी तसेच तहसीलदार, माणगाव, महाड आणि पोलादपूर यांच्या अहवालाचे अवलोकन करता महाड, पोलादपूर आणि गाणगांव या तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करणे गरजेची आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटलं आहे.

Leave a Comment