Rain Updates । मुसळधार पावसाचा इशारा कायम, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

Rain Updates । मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांना स्थलांतर करावे लागत आहे. अशातच आज हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पुणे शहरासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे असतील. हवामान खात्याने पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासह हवामान खात्याने घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. मैदानी भागात हलका ते मध्यम तिव्रतेचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच 28, 29 आणि 30 जुलैसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला असून शहरातील अनेक भागांत पाणी शिरले होते. पण धरण परिसरात शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाल्याने सुरु असलेला विसर्ग काल रात्रीपासून बंद केला आहे. मागील काही दिवसांत खडकवासला धरण परिसरात अतिमुसळधार पाऊस झाला असल्याने धरण भरले होते.

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून एकूण 22.62 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील काही दिवसांत धरणातून सोडलेल्या पाण्याचा शहरातील अनेक भागांना फटका बसला असून गुरूवारी धरणातून जास्त पाणी सोडल्यामुळे सिंहगड भागातील एकतानगरीमधील अनेक सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी शिरले होते.

तसेच आज हवामान खात्याकडून पुणे, सिंधुदुर्ग, पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, रत्नागिरी, रायगड, सातारा गोंदिया यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भाला येलो अलर्ट दिला आहे.

Leave a Comment