सोलापूर : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई (weather update from imd Mumbai) यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये (Solapur District rain update) दिनांक ०४ आणि ०५ मे २०२२ रोजी काही ठिकाणी तुरळक हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर दिनांक ०३,०६,०७ मे २०२२ रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र (मोहोळ, सोलापूर) (KVK, Mohol) यांच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा प्रकल्पाच्या जिल्हा कृषि हवामान केंद्र यांनी दिली आहे.

हवामान अंदाजावर आधारित कृषि सल्ला समितीची साप्ताहिक बैठक दिनांक ०२/०५/२०२२ रोजी झाली. त्यात म्हटले आहे की, जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस ते ४३ अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस ते २८ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ४१ ते ५८ % तर दुपारची सापेक्ष आद्रता २१ ते २६ % दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वार्‍याचा वेग ताशी १८ किमी ते २२ किमी पर्यन्त राहण्याची शक्यता आहे.

तसेच ईशारा देण्यात आलेला आहे की, सोलापूर जिल्ह्यात दिनांक ०३,०४ मे २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट, सोसाट्याच्या वार्‍यासह (वार्‍याचा वेग ताशी ३०-४०कि.मी.) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस( मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर,धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर) दिनांक ०४ मे ते १० मे २०२२ दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान सरासरी राहण्याची शक्यता आहे.

Share.

Leave A Reply

Exit mobile version