Rain Update । सावधान! पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मुसळधार; हवामान खात्याचा अलर्ट जारी

Rain Update । राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आता हवामान खात्याचा अलर्ट जारी झाला आहे.

मागील दोन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाचा जोर ओसरला होता. पण पुन्हा एकदा मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आजपासून तीन दिवस पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाच्या सरी तर शहर परिसरात मध्यम पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यात मागील गुरुवारी २४ तासांत ११४.१ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर पाच दिवसांत पावसाचा जोर कमी झाला. पण या चारच दिवसांमध्ये ७६.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. प्रत्यक्षात सरासरीच्या तुलनेत यावर्षी २८६.८ मिलिमीटर पाऊस जास्त पडला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पुणे जिल्ह्यात १ ते ३० जुलै दरम्यान सरासरी ३००.६ मिलिमीटर पाऊस पडतो, परंतु यंदा ५९४.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबई, कोकण घाटमाथा तसेच पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. त्यामुळे या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

Leave a Comment