Rain Tax : अर्र.. आता पावसाच्या पाण्यावरही टॅक्स; पहा, कुणी घेतलाय ‘हा’ अजब निर्णय

Rain Tax in Canada from next Month : पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. पाणी पावसापासून मिळते हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि यात नवीन काहीच नाही. पण याच पावसाच्या पाण्यावर टॅक्स (Rain Tax) लावला जात असेल तर.. होय हे खरं आहे. पावसाच्या पाण्यावर टॅक्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना आता पावसाच्या पाण्यावर सुद्धा कर द्यावा लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हा असा अजब आणि खिसा कापणारा निर्णय कोण घेऊ शकतं. काळजी करू नका हा निर्णय आपल्या देशात घेतला गेलेला नाही.

कॅनडा सरकारने हा (Canada) निर्णय घेतला आहे आणि पुढील महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचेही घाटत असल्याची माहिती आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीची तयारीही सरकारने केली आहे. मागील काही वर्षांपासून टोरांटो शहरासह (Toronto) पूर्ण कॅनडामध्ये स्टॉर्म वॉटर व्यवस्थापनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे लोकांचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

China PLA War : चीनची खुमखुमी वाढली! चीनी आर्मीची घोषणा; ‘या’ कारणासाठी होणार अब्जावधींचा खर्च

Rain Tax

लोकांच्या वाढत्या समस्या विचारात घेता सरकारकडून स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम तयार करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जे जास्तीचे पाणी जमा होत आहे ते बाहेर काढून टाकले जाणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात कॅनडात मुसळधार पाऊस (Heavy Rain) होतो. इतकेच नाही तर बर्फ वितळून पाणी रस्त्यांवर येते. शहरातील घरे, रस्ते सगळे काही काँक्रिटचे तयार केले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होत नाही. हे पाणी पुन्हा रस्त्यावर येते. पावसाळ्याच्या दिवसात परिस्थिती आणखी खराब होते.

कारण पाणी नाल्यांच्या माध्यमातून लोकांच्या घरापर्यंत येते. यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. रन ऑफच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी टोरांटो प्रशासनाने स्टॉर्म वॉटर चार्ज अँड वॉटर सर्व्हिस चार्ज कन्सलटेशन बरोबर चर्चा झाली आहे. यानंतर असे सांगितले जात आहे की सरकार हा निर्णय रहिवासी इमारती, कार्यालये आणि हॉटेल्स येथे लागू करू शकते.

Pakistan News : पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना पगारच नको; उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Rain Tax

सरकारच्या या निर्णयानंतर नागरिकात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत टोरांटो शहरातील नागरिक पाण्यासाठी टॅक्स देतात. अशात आता स्टॉर्म वॉटर मॅनेजेमेंटचा लोकांना पर्याय नाही. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा वाढता रोष पाहता कदाचित हा निर्णय रद्दही केला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment