Rain in Maharashtra । जर तुम्ही आज कामाशिवाय घराबाहेर पडत असाल तर त्यापूर्वी ही बातमी वाचा. नाहीतर तुम्ही संकटात येऊ शकता. भारतीय हवामान खात्याकडून आज विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
शनिवार पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली असून हवामान खात्याकडून आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आज व्यक्त केला आहे. त्यामुळं आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे . पहाटेपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सखल भागांमध्ये आतापासूनच पाणी साचले असल्याने याच रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो
अंधेरी सबवे येथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. पहाटे पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप एल बी एस मार्ग पाण्याखाली गेला असल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम होईल. वसई, विरार, नालासोपाऱ्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
या ठिकाणी अलर्ट
हवामान खात्याकडून आज कोकणातील रत्नागिरी आणि विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. तसेच ठाणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, नांदेडलाही अलर्ट जारी केला आहे.
मुसळधार पावसामुळे शाळा-कॉलेजेसना सुट्टी
मुंबईसह राज्यभरात आज पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये सकाळपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. या जिल्ह्याला आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून आले. पावसामुळे आज शहरातील सर्व शाळा-कॉलेजसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.