Rain Alert : देशाच्या अनेक भागांमध्ये सप्टेंबर महिन्यातही मुसळधार पाऊस (Heavy Rain) होत आहे. दोन ते तीन दिवस उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. हवामान खात्याने (Weather Department) दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा, छत्तीसगड, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस (Rain Alert) पडेल. ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्रामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान खात्याने आज म्हणजेच बुधवारी 24 राज्यांमध्ये यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. दिल्लीमध्ये पुढील काही दिवस येथे ढगाळ वातावरण असेल. काही भागात पाऊस (Rain) अपेक्षित आहे. बुधवारी कमाल तापमान (Temperature) 34.7 अंश तर किमान तापमान 24.6 अंश राहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल, आसाम, मणिपूर, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच बुधवारी जम्मू-काश्मीर, हिमाचल, हरियाणा, राजस्थानचा काही भाग, बिहार, झारखंड, पश्चिम, बंगाल, सिक्कीम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून ढगांची हालचाल सुरू होती, मात्र तुरळक पावसानंतर ढग गायब होत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 26 सप्टेंबरपर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशसह पूर्व उत्तर प्रदेशातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने बुधवारी पूर्वांचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
उत्तराखंड हवामान विभागाने पुढील 4 दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. डोंगराळ भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 सप्टेंबर रोजी उत्तराखंड राज्यातील बागेश्वर, पिथौरागढ, नैनिताल आणि चंपावत येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 22 सप्टेंबर रोजी डेहराडून, टिहरी, बागेश्वर, पिथौरागढमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. 23 आणि 24 सप्टेंबर रोजी उत्तराखंड राज्यातील पर्वतीय भागात जोरदार पावसाची शक्यता होती.