Rain Alert : देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. सध्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पाऊस (Rain) सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने देशाचा मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्याचबरोबर हे क्षेत्र दोन दिवसांत आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) दिशेने सरकू शकते. पुढील दोन दिवस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात पाऊस पडेल, (Rain In Himachal Pradesh, Uttarakhand, Uttar Pradesh) असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
त्याचवेळी, हवामान खात्याचे म्हणणे आहे की, पुढील चार दिवस पूर्व आणि उत्तर भारतात मुसळधार पाऊस (Heavy Rain In North India) पडू शकतो. याशिवाय ओडिशामध्ये (Odisha) 6 ऑक्टोबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच वेळी, बिहार आणि पश्चिम बांगल, सिक्कीम, ओडिशा मधील अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 7 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस आणि गडगडाटाचा अंदाज वर्तवण्यात आला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे. पश्चिम उत्तर प्रदेशातही ७ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजधानी दिल्ली येथेही ढगाळ वातावरण आहे आणि पुढील २४ तासांत पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, गुरुवारी दिल्लीत ढगाळ आकाश राहील आणि हलका पाऊस पडू शकतो. किमान तापमान 22 अंश तर कमाल तापमान 33 अंश राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी किमान तापमान 23.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दुसरीकडे हवेच्या गुणवत्तेबद्दल सांगितले तर प्रदूषण खूप (Pollution) वाढले आहे. हवा निकृष्ट दर्जाची आहे. पाऊस पडल्यानंतर प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
Must Read : Rain Alert : देशातील ‘या राज्यांत होणार मुसळधार पाऊस; पहा, काय आहे हवामानाचा अंदाज
Rain : पावसाबाबत महत्वाची बातमी..! राज्यात ‘इतके’ दिवस सुरू राहणार जोरदार पाऊस; जाणून घ्या..