Rain Alert । राज्याच्या भागांना यंदा पावसाने चांगलेच झोडपून काढायला सुरुवात केली आहे. दमदार पावसामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. ठिकाणी पेरण्यांची लगबग सुरु झाली आहे. अशातच आता हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून मुंबई, पुण्यासह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची अंदाज वर्तवला आहे.
तसेच पश्चिम घाटाच्या परिसरातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर काम असेल तरच नागरिकांनी पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे. त्याशिवाय पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं देखील आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल. नाशिक, धुळे, नंदूरबार वगळून सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. आगामी ४ दिवस राज्यात पावसाची अशीच परिस्थिती कायम राहील.
सध्या गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग जास्त आहे. याच कारणामुळे पश्चिम घाट ओलांडून मध्य राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजानुसार नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.