Rain Alert । राज्यात पुन्हा एकदा पावसाचा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने थैमान घातले आहे. वाढत्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई आणि पुण्यासह राज्यातील इतर भागांमध्ये रात्रीपासून जोरदार पावसाने बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान खात्याकडून पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार तर अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या जिल्ह्याला रेड अलर्ट
उद्या हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार ते अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला असून सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
तसेच आज कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा तर कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक जोरदार पावसाची शक्यता आहे.
पूरपरिस्थितीची शक्यता
सातारा जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. संपूर्ण कोकण आणि पुणे, नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मागील आठवड्यात पावसाने जोरदार झोडपून काढले असल्याने पुणे, कोल्हापूर आणि सांगलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. धरणे १०० टक्के भरल्याने पाणी सोडले होते. या कारणास्तव नद्यांना पूर आले आणि जनजीवनावर त्याचा फटका बसला.
धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्ग
पावसामुळे पवना धरण ९१ टक्के भरले असून आमलपट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. जर पाऊस असाच सुरू राहिला तर खडकवासला धरणातून पाणी सोडले जाईल.