Rain Alert Maharashtra: सोलापूर : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार (weather forecast) मध्य महाराष्ट्रात विभागात (सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर) दिनांक ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरी राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान सरासरी राहण्याची शक्यता आहे. (Regional Meteorological Center, Mumbai of Indian Meteorological Department, the rainfall in Madhya Maharashtra Division (Solapur, Dhule, Nandurbar, Jalgaon, Nashik, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Kolhapur))
ग्रामीण कृषि मौसम सेवा (जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र , मोहोळ , सोलापूर / Grameen Krishi Mausam Seva, District Krishi Vigyan Kendra, Krishi Vigyan Kendra, Mohol, Solapur) यांनी हवामान अंदाजावर आधारित कृषि सल्ला समितीची साप्ताहिक बैठक झाल्यानंतर याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये दिनांक ०७,११ सप्टेंबर २०२२ रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर दिनांक ०८,०९ आणि १० सप्टेंबर २०२२ रोजी बहुदा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस ते ३४ अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान २० ते २३ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता ८१ ते ८८ % तर दुपारची सापेक्ष आद्रता ५२ ते ७६ % दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वार्याचा वेग ताशी ९ किमी ते १७ किमी पर्यन्त राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यात दिनांक ०६ आणि ०७ सप्टेंबर २०२२ रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वार्यासाह (वार्याचा वेग ताशी ३० – ४० किमी ) पावसाची शक्यता आहे.
सामान्य सल्ला | शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचे किड व रोगसंदर्भात नियमित सर्वेक्षण करून जर प्रादुर्भाव आर्थिक नुसकान पातळीच्या वर आसल्यास योग्य उपाययोजना कराव्यात.
पिकांतील आंतरमशागतीचे कामे पावसाचा अंदाज पाहून करावीत. पडणार्या पावसाचे पाणी शेतात साठविण्यासाठी/ मुरविण्यासाठी योग्य उपाययोजना करावी. हवामान अंदाजावर आधारित कृषिसल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता मेघदूत या मोबाइल अॅपचा (Meghdoot mobile app) वापर करावा. विजेच्या अंदाजाच्या पूर्वानुमानाकरिता दामिनी मोबाइल अॅपचा (agriculture advice and weather forecast based Damini mobile app) वापर करावा. शेतकरी बांधवांनी मेघ गर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. मेघ गर्जना विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागांना तसेच भाजीपाला पिकांना जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडू नये म्हणून काठी बांबू च्या सहय्याने आधार द्यावा. शेतामध्ये काम करत असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली थांबणे टाळावे. जनावरे तलाव, नदी किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी असतील तर त्यांना त्वरित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. जनावरे ट्रॅक्टर किंवा इतर धातूंच्या वस्तूंपासून लांब बांधावीत. वाहने झाडाखाली उभी करू नयेत. काढणी केलेला शेती माल प्लास्टिकच्या शीटणे झाकावा. विद्युत उपकरणे विद्युत तारा यांचा संपर्क टाळा जनावरांना झाडाखाली जमा होऊ देऊ नये. |
संदेश | पावसाची शक्यता असल्याने पक्व खरीप मूग, उडीद पिकाची त्वरित काढणी करावी. व काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
(Animals should not be allowed to gather under trees. Message Due to the possibility of rain, ripe kharif moong, Udid crop should be harvested immediately. And the harvested crops should be stored in a safe place) |