Railway Rules: दररोज लाखोंच्या संख्येने प्रवाशी भारतीय रेल्वे प्रवास करत असतात. रेल्वेमध्ये कमी पैशांमध्ये तुम्ही जास्त लांबीचे अंतर सहज पार करू शकतात यामुळे दररोज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात.
यातच जर तुम्ही देखील भारतीय रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यापूर्वी काही नियम माहिती असणे आवश्यक आहे नाहीतर प्रवासादरम्यान तुमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत हे नियम
बर्थ नियम
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मिडल बर्थशी संबंधित नियम जाणून घेणे आवश्यक आहे.
तुम्ही बुक केलेली कधी कधी मिडल बर्थ असून शकते. त्यामुळे, रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही रात्री 10 नंतरच मधला बर्थ उघडू शकता आणि सकाळी 6 नंतर तुम्हाला ही सीट बंद करावी लागेल.
मोबाईलशी संबंधित नियम
प्रवास करण्यापूर्वी तुम्हाला मोबाईलशी संबंधित नियम देखील माहिती असणे आवश्यक आहे. कारण की रेल्वेमध्ये तुम्ही रात्रीच्या वेळी मोबाईलचा लाउडस्पीकर वापरू शकत नाही.
रात्रीच्या वेळी तुम्ही कॉलवर कोणाशी बोलत असाल किंवा गाणी ऐकत असाल. असे केल्यास इतर प्रवाशांना त्रास होऊ शकतो आणि तक्रार आल्यास तुमच्यावर योग्य ती कारवाई केली जाऊ शकते.
या गोष्टी घेऊ नका
तसेच प्रवास करताना तुम्हाला काही गोष्टी रेल्वेत सोबत ठेवता येत नाही. या यादीमध्ये दुर्गंधीयुक्त वस्तू, गॅस सिलिंडर, सिगारेट, स्टोव्ह, ज्वलनशील पदार्थ, स्फोटक पदार्थ इत्यादींचा समावेश आहे. जर तुम्ही हे रेल्वेमध्ये घेऊन जाताना पकडले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
गाडी मिळाली नाही तर
समजा तुमची ट्रेन नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून आहे आणि काही कारणास्तव तुम्ही ट्रेनमध्ये चढला नाही, तर तुमच्याकडे पुढील दोन स्थानकांवरून ट्रेनमध्ये चढण्याचा पर्याय आहे. रेल्वे तुम्हाला ही सुविधा देते.