Railway News: Himachal Pradesh: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) उना जिल्ह्यात देशातील चौथ्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय पंतप्रधान मोदी येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी उना येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) राष्ट्राला समर्पित करतील आणि जिल्ह्यातील बल्क ड्रग पार्कची (Bulk Drug Park) पायाभरणी करतील. पंतप्रधान मोदी चंबा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात दोन जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या (PMGSY) तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करतील.
PM Shri @narendramodi ji flags off the Vande Bharat Express from Una, Himachal Pradesh#HimachalWithDoubleEnginehttps://t.co/CjiypTl892
— Bhupender Yadav (@byadavbjp) October 13, 2022
उना येथील अंब अंदौरा रेल्वे स्थानकावरून नवी दिल्लीला (New Delhi) येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधान मोदींनी हिरवी झेंडी दाखवली. गेल्या महिन्यात मोदींनी गुजरातमध्ये तिसरी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केली. ही ट्रेन गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावते. नवीन वंदे भारत ट्रेन ही पूर्वीच्या तुलनेत एक सुधारित आवृत्ती आहे, जी खूपच हलकी आहे आणि कमी कालावधीत जास्त वेगाने पोहोचण्यास सक्षम आहे. ती फक्त ५२ सेकंदात १०० किमी प्रतितास वेग पकडू शकते. ही ट्रेन पंजाबमधील किरतपूर साहिब, आनंदपूर साहिब, ज्वाला देवी आणि माता चिंतापूर्णी या तीर्थक्षेत्रांना जोडेल.
उना ते दिल्ली प्रवास पाच तासांत होणार पूर्ण
उना ते दिल्ली हा प्रवास अवघ्या पाच तासांत पूर्ण करता येणार आहे. वंदे भारत सुरू झाल्यामुळे पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh)तसेच केंद्रशासित प्रदेश चंदीगडमधील (Chandigarh) रहिवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून ६ दिवस दिल्लीहून सकाळी ५.३० वाजता निघेल आणि उना येथे सकाळी १०.३४ वाजता पोहोचेल. त्या पुढे ११.०५ वाजता आंब-अंदौरा येथे पोहोचेल. ही ट्रेन बुधवारी मात्र धावणार नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) या ट्रेनने नवी दिल्लीला येणार आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Haryana Chief Minister Manohar Lal Khattar) हे चंदीगडमध्ये याच ट्रेनमध्ये बसणार आहेत.
नवी दिल्ली ते उना वेळापत्रक
नवी दिल्ली येथून पहाटे ५.५० वाजता निघेल.
हरियाणाच्या अंबाला कॅन्टला सकाळी ८.०० वाजता पोहोचेल.
सकाळी ८.४० वाजता चंदीगडला पोहोचेल.
सकाळी १०.३४ वाजता उनाला पोहोचेल.
सकाळी ११.०५ वाजता आंब-अंदौरा येथे पोहोचेल.
उना ते नवी दिल्ली टाइम टेबल
आंब-अंदौरा येथून दुपारी १:३० वाजता सुटेल.
दुपारी १.२१ वाजता उनाला पोहोचेल.
दुपारी ३.२५ वाजता चंदीगडला पोहोचेल.
दुपारी ४.१३ वाजता अंबाला येथे पोहोचेल.
संध्याकाळी ६.२५ वाजता नवी दिल्लीला पोहोचेल.
ट्रेनची खासियत काय आहे?
जुने वंदे भारत १३० किलोमीटरवर धावत होते, आता ही गाडी १६० किलोमीटर वेगाने धावू शकेल असे अपग्रेड करण्यात आले आहे. तर पुढे १८० किमी वेगानेही ही चालवता येते. प्रत्येक सीटवर टॉक बटण बसवण्यात आले आहे. उदाहरणार्थ, सीटजवळील टॉक बटण (Talk Button) थेट ड्रायव्हरशी बोलू शकते. आता साखळी ओढायची गरज नाही. यासाठी अलार्म बटण बसवण्यात आले आहे. नवीन वंदे भारत एक्स्प्रेस केवळ ५२ सेकंदात १०० किमीचा वेग पकडू शकते, तर पूर्वीच्या वंदे भारतला ५५ सेकंदांचा कालावधी लागला होता.
- Must Read:
- Railway News: लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी गुड न्यूज; पश्चिम रेल्वेकडून आसनांमध्ये वाढ
- Railway News: मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून ७८ दिवसांचे वेतन केले मंजूर; पहा सविस्तर
- Business News : ही कंपनी २,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावत आहे. दुसरी वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते कटरा दरम्यान धावते. गुजरातची राजधानी गांधीनगर (Gandhinagar) ते मुंबई सेंट्रल (Mumbai Central) दरम्यान तिसरा वंदे भारत सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू केल्याने तेथील पर्यटनाला चालना मिळण्यास आणि आरामदायी आणि जलद प्रवासाचा मार्ग उपलब्ध होण्यास मदत होईल, असे पीएमओने (PMO) म्हटले आहे. दिल्ली आणि उना दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस अंबाला, चंदीगड, आनंदपूर साहिब आणि उना येथे थांबेल.