Railway News Update: मुंबईची लाइफलाइन (Mumbai Lifeline) असलेल्या लोकल ट्रेनने (Local train) लाखो महिला प्रवास करत असतात. घड्याळाच्या काट्यावर मुंबईकरांचे आयुष्य सुरु असते. दरम्यान मुंबई उपनगरीय लोकलमध्ये (Mumbai Suburban Local) महिलांसाठी बसण्याची पुरेशी आसन व्यवस्था नाही. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सकाळच्या वेळी तर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हेच लक्षात घेऊन आता पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) महिलांसाठी एक गुड न्यूज देण्यात आली आहे. यामुळे महिलांना येणाऱ्या अडचणी कमी होऊ शकतात. आता महिलांसाठी आसन व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात महिलांसाठी आसनांमध्ये पश्चिम रेल्वेकडून वाढ करण्यात आली आहे. १२ डब्यांच्या लोकलमधील अकराव्या डब्याचा काही भाग महिलांसाठी राखीव ठेवला जाणार आहे. ८ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यानंतर लोकलमध्ये चौथा डबाही महिलांसाठी उपलब्ध आहे. द्वितीय श्रेणीच्या या डब्यामध्ये महिला प्रवाशांना अतिरिक्त २५ आसने देण्यात आली आहेत.
प्रवासी संघटनांनी केली होती मागणी
महिलांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात यावी अशी पश्चिम रेल्वे येथील प्रवासी संघटनांनी (Travel Associations) मागणी केली होती. महिला प्रवाशांसाठी विशेष लोकल (special local) आणि अतिरिक्त डबे जोडण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. यानंतर पश्चिम रेल्वेने (Western Railway)महिला आणि पुरुष या प्रवाशांच्या संख्येचे सर्वेक्षण केले. यामध्ये महिला प्रवाशांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले. यानंतर महिलांना अतिरिक्त जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्चगेटच्या (Churchgate) टोकापासून ११ व्या कोचमध्ये आणि विरारच्या टोकापासून २ क्रमांकच्या कोचमध्ये अतिरिक्त कोचची तरतूद केली असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (Chief Public Relations Officer) समीर ठाकूर यांनी माहिती दिली.
- Must Read:
- Railway News: मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून ७८ दिवसांचे वेतन केले मंजूर; पहा सविस्तर
- Health Tips: कमी वयात दृष्टिहीनता टाळण्यासाठी घ्या ही काळजी; तज्ज्ञांनी सांगितले हे उपाय
- Agriculture News: Nandurbar: अबबो…पावसामुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान
किती वाढली महिला प्रवाशांची संख्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम रेल्वेवर महिला तिकीटधारकांची टक्केवारी २४.३८ टक्के एवढी होती. ती आता २४.६४ टक्के झाली आहे. सर्वेक्षणामध्ये ही माहिती समोर आल्यानंतर रेल्वे प्रशानाकडून महिलांसाठीच्या राखीव जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महिलांचे डबे हे २०१९ मध्ये पश्चिम रेल्वेने अपडेट केले होते. या डब्यांचे आधुनिकीकरणही करण्यात आले होते.