Railway Insurance : भारतात मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जाळे पसरले आहे. रेल्वे आपल्या प्रवाशांना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत असते. विशेष म्हणजे रेल्वे आपल्या प्रवाशांना देते तब्बल 10 लाखांचा विमा देत आहे.
भारतीय रेल्वे प्रत्येक प्रवाशाला रेल्वे प्रवास विमा देते. पण हे लक्षात घ्या की हा विमा त्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे जे रेल्वे तिकीट बुक करताना विमा घेतात. महत्त्वाचे म्हणजे अनेकांना या विम्याची माहिती नाही.
रेल्वे प्रवास विमा
हे लक्षात घ्या की रेल्वे प्रवास विम्याचा लाभ ज्या प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट बुक केले आहे त्यांना उपलब्ध आहे. समजा एखाद्या प्रवाशाने ऑफलाइन म्हणजेच काउंटरवर तिकीट बुक केले तर त्याला हा लाभ घेता येत नाही.
पण हा विमा घेणे पूर्णपणे प्रवाशांवर अवलंबून असते. प्रवाशांची इच्छा असेल तर तो हा विमा नाकारू शकतो. किमतीचा विचार केला तर रेल्वे विम्याचा प्रीमियम ४५ पैसे इतका आहे. जनरल कोच किंवा डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विम्याचा लाभ मिळत नाही.
किती मिळतो विमा?
भारतीय रेल्वेचा हा विमा 10 लाख रुपयांचे संरक्षण देतो. यात रेल्वे अपघातात झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून केली जाते. रेल्वे अपघातात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर कंपनी नॉमिनीला 10 लाख रुपयांची विमा रक्कम देते. तर एखादा प्रवासी अपंग झाला तर कंपनी प्रवाशाला 10 लाख रुपये देते. कायमस्वरूपी अपंगत्व आले तर त्या प्रवाशाला 7.5 लाख रुपये मिळतात. त्याचबरोबर जखमी प्रवाशाला उपचारासाठी दोन लाख रुपये मिळतात.
असा घ्या विमा लाभ
तुम्हालाही रेल्वे प्रवास विम्याचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला ऑनलाइन तिकीट बुक करताना प्रवास विमा पर्याय निवडावा लागणार आहे. विम्याचा हप्ता तिकीटासोबतच वसूल केला जाईल.
समजा तुम्ही विमा पर्याय निवडताच तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर एक लिंक पाठवण्यात येईल. या लिंकवर जाऊन तुम्हाला नॉमिनीचे तपशील भरावे लागणार आहेत. नामनिर्देशित व्यक्तीचे नाव जोडल्यानंतर विमा दावा सहजपणे प्राप्त होतो.