Raigad Lok Sabha | बाब्बो..! रायगडमध्ये एकाच नावाचे 3 उमेदवार; पॉलिटिक्सच्या भन्नाट खेळीचा फटका कुणाला?

Raigad Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू (Raigad Lok Sabha Election 2024) आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार लढत होणार आहे. राज्यात अनेक मतदारसंघात उमेदवार निश्चित झाले आहेत आणि या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याबरोबरच प्रचाराला सुरुवात केली आहे. रायगड हा मतदारसंघ राज्यात चर्चेचा ठरला आहे. कारण या मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात लढत होणार आहे. सुनील तटकरे यांना महायुतीने पुन्हा रिंगणात उतरवले आहे तर अनंत गिते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. गीते यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.

मात्र आनंद गिते यांची एका वेगळ्याच कारणामुळे अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामागे कारणही खास आहे. रायगड मतदारसंघात अनंत गीते नावाचे आणखी दोन उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या दोन अपक्ष उमेदवारांच्या मदतीने गीते यांना थोपविण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Maharashtra Loksabha Election | बाब्बो.. शिवसेनेला मोठा धक्का..! म्हणून शिर्डीचे खासदार लोखंडे यांच्याबाबत इडीकडे तक्रार

Raigad Lok Sabha

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. रायगड या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 7 मे रोजी मतदान होणार आहे. या पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवार अनंत गीते या नावाचे आहेत. यातील दोन अनंत गीते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनंत गंगाराम गीते यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. याव्यतिरिक्त नितीन जगन्नाथ मयेकर, आस्वाद जयदास पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

एकाच मतदार संघात एकाच नावाचे जर अनेक उमेदवार असतील तर यामुळे गोंधळ निर्माण होऊन उमेदवारांना फटका बसतो. याआधीही अशी उदाहरणे पाहिली गेली आहेत. सन 1991 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार दत्ता पाटील यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने आणखी एका दत्ता पाटलांना उमेदवारी दिली होती. याचा फटका दत्ता पाटील यांना बसला. हाच पॅटर्न 2014 मध्ये देखील दिसून आला होता.

या निवडणुकीत सुनील तटकरे यांना पराभूत करण्यासाठी सुनील तटकरे नावाच्या एका व्यक्तीला अपक्ष म्हणून मैदानात उतरवण्यात आले होते. या निवडणुकीत सुनील तटकरे यांना 2000 मतांनी पराभूत व्हावे लागले होते तर दुसरीकडे त्यांच्या नावाशी साम्य असणाऱ्या व्यक्तीला एकूण 9 हाजार 849 मध्ये मिळाली होती.

Raigad Lok Sabha

Shirdi Loksabha Election | शिर्डीच्या खासदारांनी गट्टम केलेत 16 कोटी..! उमेदवारी रद्द करण्यासह वसूली करण्याची ED कडे मागणी

आता असाच प्रकार अनंत गीते यांच्याबाबतीत घडला आहे. अनंत गीते यांच्या नावाचे साम्य असणारे आणखी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आता मतदान करताना मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अनंत गीते यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनंत गीते यांना मिळणारी मते चुकून अपक्ष उमेदवार असलेल्या दोन्ही गीतेंना पडल्यानंतर मतविभाजन होण्याची परिस्थिती निर्माण होईल.

आता अनंत गीते यांना खरच हा फटका बसणार का याचे उत्तर निकालानंतरच मिळणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत जर या दोन्ही अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तरच आनंद गीते यांना दिलासा मिळू शकतो अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात तीन अनंत गीते आपल्याला दिसू शकतात.

Leave a Comment