Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोदी सरकारवर मोठा आरोप, म्हणाले, माझ्यावर ईडी…

Rahul Gandhi: लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेत सुरू असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.

आपल्या भाषणात त्यांनी चक्रव्यूहचा उल्लेख करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता तर आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप लावला आहे. 

आपल्याला भाषणानंतर ईडी त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी करत असल्याचा दावा त्यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.

राहुल गांधी यांनी 29 जुलै रोजी केलेल्या भाषणात चक्रव्यूहचा उल्लेख केला होता. तर आज त्यांनी  दावा केला की ईडीच्या सूत्रांनी त्यांना सांगितले आहे की कारवाईची तयारी सुरू झाली आहे. मात्र मी देखील या कारवाईचा स्वागत करतो. अस राहुल गांधी यांनी X वर म्हंटले आहे.

21व्या शतकातील नवा ‘चक्रव्यूह’

X वरील आपल्या पोस्टमध्ये राहुल म्हणाले की, ‘चक्रव्यूहवरील माझे भाषण दोघांपैकी एकाला आवडले नाही. ईडीच्या आतल्या व्यक्तीने मला सांगितले की, छापा टाकण्याची योजना आखली जात आहे. ईडीचे संचालक, मी उघड्या हाताने वाट पाहत आहे. माझ्या जागेवर चहा-बिस्किटे मिळतील.

अर्थसंकल्प 2024 वर बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, देशातील शेतकरी, कर्मचारी आणि तरुण घाबरले आहेत. काँग्रेस नेत्याने पंतप्रधानांवर कमळाचे चिन्ह दाखविल्याबद्दल टीका केली आणि म्हटले की 21 व्या शतकात नवीन ‘चक्रव्यूह’ तयार झाला आहे.

ते म्हणाले, ‘हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात सहा जणांनी अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून मारले. मी थोडे रिसर्च केले आणि कळले की ‘चक्रव्यूह’ याला ‘पद्मव्यूह’ असेही म्हणतात. म्हणजे कमळासारखी रचना. 21व्या शतकात नवे ‘चक्रव्यूह’ तयार झाले आहे, तेही कमळासारखे आहे. पीएम मोदी हे चिन्ह छातीवर धारण करतात. अभिमन्यूच्या बाबतीत जे घडले तेच आज देशातील तरुण, शेतकरी, महिला, लघु आणि मध्यम व्यावसायिक यांच्याबाबत घडत आहे. 

अभिमन्यूला सहा जणांनी मारले. आजही केंद्र सरकारच्या चक्रव्यूहात सहा जण आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी हे सहा लोक भारतावर नियंत्रण ठेवत आहेत.

Leave a Comment