Rahul Gandhi । ‘त्या’ वक्तव्यावरून राहुल गांधी पुन्हा अडचणीत? जाणून घ्या नेमकं प्रकरण

Rahul Gandhi । सध्या काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये आहे. पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एका वादग्रस्त विधानावरून टीकेचा सामना करावा लागत आहे. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

वादग्रस्त वक्तव्यावरून राहुल गांधींवर निशाणा

सध्या राहुल गांधींचे हे भाषण चर्चेत आहे. यावरून त्यांना विरोधही होत असून त्यांचे हे वक्तव्य वादग्रस्त असल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधींनी वाराणसीतील जनता आणि तरुणांना अंमली पदार्थांचे व्यसनी आणि मद्यपान करणारे वक्तव्य केले आहे. याबाबत उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांनी राहुल गांधींवर चांगलाच निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, “जो स्वतः ड्रग्ज घेतो तो इतरांना ड्रग्ज ॲडिक्ट म्हणतो. देश त्यांना सोडणार नाही. मी आणि माझे कुटुंब दारू पीत नाही. यासाठी मी प्रमाणपत्र देऊ शकतो. पण राहुल आणि त्यांचे कुटुंबीय दारू पीत नाहीत का? त्याचे प्रमाणपत्र देऊ शकाल का?,” असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेचा एक भाग म्हणून राहुल गांधी मंगळवारी रायबरेली येथे पोहोचले होते. यावेळी राता चौकातील जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले, मी वाराणसीला गेलो होतो. त्या ठिकाणी हजारो तरुण दारू पिऊन रस्त्यावर पडलेले आणि वाद्य वाजवताना मला पाहायला मिळाले. बनारसच्या रस्त्यावर दारू पिऊन तरुणाई नाचत आहे.

तर दुसऱ्या दिवशी तरुण मला भेटून म्हणतात की आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, पेपर लीक झाला आहे. एकामागून एक पेपर लीक होतच आहेत. एक तरुण आमच्याकडे येऊन म्हणतो की कोचिंगसाठी पाच लाख रुपये दिले आणि परीक्षेच्या दिवशी पेपर फुटला. राहुल गांधी यांनी अमेठीतही असेच म्हटले होते. त्यांच्या या वक्त्यावरून सध्या त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

Leave a Comment