Rahul Gandhi : मोठी बातमी! राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा सोडून अचानक झाले वायनाडला रवाना, नेमकं कारण काय?

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशातून जात असून आता राहुल गांधी यांच्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. राहुल गांधी अचानक आपल्या प्रवासाला ब्रेक लावून वायनाडला रवाना झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

वायनाड येथे शुक्रवारी सकाळी जंगली हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. पण कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मृत व्यक्तीची माहिती देताना वन अधिकाऱ्याने सांगितले की, तो वन विभागाचा इको-टुरिझम गाईड होता. तो कुरुवा बेटावर असणाऱ्या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर तैनात होता. तसेच याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी माहिती दिली आहे.

पुन्हा सुरू होणार प्रवास

राहुल गांधींच्या वायनाड भेटीची माहिती देत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, वायनाडला राहुल गांधींच्या उपस्थितीची खूप गरज आहे. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता ते वाराणसीहून वायनाडला रवाना झाले आहेत. राहुल गांधी रविवार, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता प्रयागराज येथून भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरू करणार आहेत.

त्यावेळी जंगली हत्तींच्या हल्ल्यात इको-टूरिझम गाईडचा मृत्यू झाल्यानंतर मुख्य विरोधी पक्ष यूडीएफ आणि भाजपकडून सर्वसामान्यांवर होणाऱ्या प्राण्यांच्या हल्ल्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हास्तरीय बंदची घोषणा करण्यात आली होती.

काँग्रेसची यात्रा शुक्रवारी उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे आणि यानंतर ही यात्रा रायबरेलीमार्गे राजस्थानमध्ये प्रवेश करेल. 14 जानेवारी 2024 रोजी पूर्व ते पश्चिम मणिपूर असा सुरू झालेला काँग्रेसचा हा प्रवास 15 राज्यांतून 6,700 किलोमीटरचे अंतर कापून मुंबईत संपणार आहे. वाटेत सर्वसामान्यांना भेटून ‘न्याय’चा संदेश ठळकपणे मांडणे हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे.

Leave a Comment