Rahul Gandhi: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मोदी आडनाव प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा सुनवणाऱ्या सुरत न्यायालयाचे न्यायाधीश हरीश वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानुसार आता हरीश वर्मा यांची पदोन्नती थांबवण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सीजेएम हरीश वर्मा यांच्या बढतीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. यामुळे आता न्यायाधीश हरीश वर्मा यांच्या पदोन्नतीची आशा देखील संपली आहे.
कारण न्यायालयाच्या आदेशानंतर नवीन पदोन्नती यादी तयार केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील रविकुमार यांच्या खंडपीठाने न्यायमूर्ती एमआर शाह आणि न्यायमूर्ती सीटी यांच्या न्यायिक पदोन्नतीच्या गुजरात उच्च न्यायालयाच्या शिफारशीला स्थगिती दिली.
न्यायमूर्ती एमआर शहा यांनी आदेशात म्हटले आहे की, याचिका प्रलंबित असताना राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आणि त्यानंतर न्यायालयाने नोटीस बजावली.
खरेतर गुजरातमधील कनिष्ठ न्यायालयातील 68 न्यायाधीशांना पदोन्नती देण्यात आली होती. या न्यायाधीशांमध्ये राहुल गांधींना शिक्षा सुनावणारे न्यायाधीश हरीश वर्मा, तसेच न्यायाधीश जयेश एल चौवटीया यांचा समावेश आहे.
पदोन्नती प्रक्रियेत कमी गुण असलेल्या न्यायाधीशांची निवड मात्र गुजरातमध्ये दोन न्यायिक अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाने अवलंबलेल्या पद्धतीवर आक्षेप घेतला होता.याप्रकरणी गेल्या सुनावणीनंतर 8 मे रोजी सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता.