Rahul Gandhi : येत्या 4 जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. या निकालाकडे संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष लागले आहे. अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणूक निकालापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार असून काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे उमेदवारांशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
बैठकीला प्रमुख नेते राहणार उपस्थित
राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि इतर नेत्यांचा समावेश असून बैठकीत 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणी दिवसाच्या धोरणात्मक तयारीवर चर्चा होईल.
तसेच शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी आघाडीची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस, डीएमके, जेएमएम,समाजवादी पार्टी, सीपीआयएम, आप, आरजेडी, शिवसेना यूबीटी, एनसीपी सपा पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.
बैठकीनंतर विरोधी आघाडीच्या नेत्यांनी 295 हून अधिक जागा जिंकल्याचा दावा केला होता. दरम्यान, एक्झिट पोलच्या निकालात विरोधी आघाडीला केवळ दीडशेच्या आसपास जागा मिळाल्या आहेत.
एनडीएला मिळाले प्रचंड बहुमत
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीने सलग तिसऱ्या वेळी सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. एक्झिट पोलच्या निकालांनी एनडीएच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एनडीए आघाडी मागील कामगिरीत सुधारणा करेल आणि प्रचंड बहुमत मिळवेल, असा दावा एक्झिट पोलने केला आहे. दरम्यान, भाजपने 400 पार करण्याचा नारा दिला होता. तसेच एक्झिट पोलच्या निकालात एनडीए या आकड्याभोवती दिसत आहे.