Radhakrishna Vikhe Patil : आदिवासींच्या जमिनीबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, होणार हा फायदा

Radhakrishna Vikhe Patil : बेकायदेशीरपणे आदिवासीच्या जमिनी लाटणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण आता राज्यातील आदिवासी जमिनी हस्तांतरण प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करून चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

विधानपरिषमध्ये नंदूरबार येथील आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी केल्याचा प्रश्न उपस्थित केला असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देताना माहिती सदरची माहिती दिली. विशेष म्हणजे फक्त एकाच प्रकरणी नाही तर नागपूर, कोकण, अमरावती आणि नाशिक विभागातील सुद्धा अदिवासी जमिनीबाबत चौकशी केली जाईल अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील आदिवासी जमिनी बाबत वाढत असलेले प्रश्न पाहता आदिवासी जमिनी हडपण्याचे प्रकार समोर येत आहेत. आदिवासी बांधवांना न्याय मिळावा आणि त्यांच्या जमिनीचे संरक्षण व्हावे यासाठी येत्या 15 दिवसात राज्यातील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून त्यांना अहवाल सादर केला जाणार आहे.

तसेच कुठे आदिवासी जमिनीबाबत गैरव्यवहार झाला असेल किंवा आदिवासी बांधवांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी हडप केल्या असतील, असे आढळून आले तर त्यावर शासनाच्या मार्फत कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश विखे पाटील यांनी दिले आहेत.

याबाबत विखे पाटील म्हणाले की, शासन हे नेहमीच आदिवासी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या जमिनीचे सरंक्षण करण्यास कटिबद्ध आहे. कोठेही हलगर्जीपणा खपून घेतला जाणार नाही. चौकशीमुळे राज्यातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळेल,” असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment