दिल्ली – दिल्लीतील हनुमान जयंती दरम्यान शनिवारी जहांगीरपुरी (Jahangirpuri ) परिसरात दोन समुदायांमध्ये हिंसाचार उसळला. वृत्तानुसार, दिल्लीतील जहांगीरपुरी येथे दोन समुदायांमध्ये जोरदार हाणामारी झाली. मिरवणूक काढताना दगडफेक करण्यात आली. पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत.
जखमींना जहांगीरपुरी येथून बाबू जगजीवन राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलीस पीआरओचे काम पाहणारे डीसीपी अन्वैस राय सांगतात की, जहांगीरपुरीतील मिरवणुका दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) बोलले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांचे विशेष पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) दीपेंद्र पाठक यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी हिंसाचार पाहता आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही पारंपारिक मिरवणूक होती आणि सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते, परंतु ही मिरवणूक कुशल सिनेमा हॉलजवळ येताच दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न करताना घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस जखमी झाले.मिरवणुकीत पायी जाणाऱ्या लोकांवर दगडफेक आणि तुरळक जाळपोळ झाल्याच्या बातम्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या गदारोळात कोणते पोलीस जखमी झाले आहेत, याची पुष्टी केली जात आहे. या घटनेशी संबंधित काही व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक दगडफेक आणि जाळपोळीच्या मागे धावताना दिसत आहेत. जाळपोळ आणि दगडफेकीच्या वेळी हेल्मेट घातलेले पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसले. काही व्हिडिओंमध्ये तरूण दगडफेक करतानाही दिसत आहेत.
जाळपोळीच्या घटना पाहता दिल्ली अग्निशमन सेवेच्या 2 गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या होत्या, मात्र दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी घटना तुरळक असल्याचं सांगितलं, त्यामुळे तिथं ऑपरेशन मागे घेण्यात आलं आहे आणि गाड्या मागवण्यात आल्या आहेत.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, सर्व लोकांनी शांतता राखली पाहिजे. शांतता प्रस्थापित केल्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही. प्रत्येकाने शांतता व सुव्यवस्था राखली पाहिजे. गरज पडली तर एजन्सी आहे, पोलीस आहे, कोणाची जबाबदारी आहे. दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मी लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही करेन.
दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना म्हणाले की, उत्तर-पश्चिम जिल्ह्यातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. जहांगीरपुरी आणि इतर संवेदनशील भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना परिसरात राहून कायदा व सुव्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून सतत गस्त घालण्यास सांगण्यात आले आहे. दंगलखोरांवर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. त्यांनी सर्वसामान्यांना सोशल मीडियावरील अफवा आणि खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नये असे सांगितले.
शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. नायब राज्यपालांनीही घटनेची माहिती घेतली. दिल्लीत कपिल मिश्रासह भाजप नेत्यांनी हे बांगलादेशी घुसखोरांचे काम असल्याचा आरोप केला. तर भाजप खासदार मनोज तिवारी यांनी दावा केला की हा एका मोठ्या कटाचा भाग आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी.