Q2 Result : अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (Adani Ports and Special Economic Zone) यांनी वार्षिक आधारावर त्रैमासिक (Quarterly) आकड्यांचा मजबूत निकाल नोंदवला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा (Profit) ६८.५ टक्क्यांनी वाढून १६७७.४८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
कार्गो व्हॉल्यूम (Cargo volume) वाढीमुळे ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल (Revenue) ३२.८ टक्क्यांनी वाढून ५२१०.८० कोटी रुपये झाला. जुलै-सप्टेंबरमध्ये (July-September) मालवाहतूक १५ टक्क्यांनी वाढून ८६.६ मिलियन मॅट्रिक टन्स (MMT-Million Matrics Tones) झाली.
- Business Deal : शिबाशिष सरकारने १४० दशलख डॉलर देऊन खरेदी केल्या “या” दोन कंपन्या
- IPO Beaking : लवकरच येणार “या” चार कंपन्यांचे आयपीओ
- Market Updates : म्हणून परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII’s) केली १ अब्ज डॉलरचे गुंतवणूक
- Metaverse : “मेटावर्स’मध्ये प्रवेश करणारी ‘ही’ पहिली भारतीय कंपनी
नोमुराने (Nomura) आपल्या पूर्वावलोकन नोटमध्ये म्हटले होते की, “कमी थर्मल कोळशाच्या आयातीमुळे दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक वर्ष २३ मध्ये (2QFY23) खंड ८६.६ mnt वरून q-o-q (क्वार्टर-ऑन-क्वार्टर) विरुद्ध पहिल्या तिमाहीतील आर्थिक वर्ष २३ मध्ये (1QFY23) खंड सुमारे ९१ mnt वर घसरला आहे”. कंपनीच्या बंदर आणि सेझ ( Port and SEZ) क्रियाकलापांमधून सप्टेंबर तिमाहीत महसूल वाढून रु. ४६०९.२९ कोटी झाला आहे, जो गेल्या वर्षी रु. ३५३०.६८ कोटी होता.
“H1 (first half of a fiscal year (April through September) FY23 हे “APSEZ”च्या (Adani Ports and Special Economic Zone Limited) इतिहासातील विक्रमी सहामाही नोंद (Record half in history) आहे, ज्यामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक माल (highest ever cargo volume), महसूल (Revenue) आणि EBITDA आहे. या मजबूत कामगिरीचा ऑक्टोबरमध्ये विस्तार करून, APSEZ ने सात महिन्यांत २०० MMT कार्गो थ्रू-पुट (cargo through-put) गाठले, हा आणखी एक नवीन टप्पा आहे,” असे अदानी पोर्ट्सचे (Adani ports) सीईओ (CEO) आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे (Special Economic Zone) पूर्णवेळ संचालक (Whole time director) करण अदानी (Karan Adani) म्हणाले.
अदानी पोर्ट्सचे (Adani ports) संपूर्ण भारतात १० ठिकाणी अस्तित्व आहे. कच्छच्या (Kachchha) आखातावरील मुंद्रा बंदर (Mundra port) हे भारतातील सर्वात मोठे व्यापारी बंदर (India’s largest commercial port) आहे.