दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुति (Vladimir Putin)न यांनी संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांना सांगितले की, युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी त्यांना अजूनही चर्चा अपेक्षित आहे. “लष्करी कारवाई सुरू असूनही, आम्हाला अजूनही आशा आहे की आम्ही राजनैतिक मार्गावर करारावर पोहोचण्याची शक्यता आहे. आम्ही वाटाघाटी करत आहोत, आम्ही चर्चा नाकारत नाही, असे पुतिन यांनी गुटेरेस यांना सांगितले.
गुटेरेस संघर्षात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर ते पहिल्याच रशिया (Russia) दौऱ्यावर आहेत. मॉस्कोहून ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी कीवला जाणार आहेत. युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढ करण्यासाठी 40 देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी जर्मनीमध्ये (Germany) चर्चा केली. युक्रेनच्या संरक्षणविषयक गरजांवर चर्चा करण्यासाठी अमेरिका आणि त्याचे मित्र देश महिन्यातून एकदा भेटतील. अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टिन यांनी ही माहिती दिली आहे. युक्रेनला अवजड शस्त्रे पुरवण्यासाठी अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांवर दबाव आणत आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी काँग्रेसला सांगितले की, पुतिन यांनी मुत्सद्देगिरीबाबत गंभीर असल्याची कोणताही प्रतिसाद दिला नाही. वॉशिंग्टन युक्रेनला रशियन आक्रमणा विरोधात लढण्यासाठी मदत पुरवत राहील असेही त्यांनी सांगितले. जर्मनी युक्रेनला लष्करी मदत पाठवणार असल्याचे जर्मनीचे संरक्षण मंत्र्यांनी बैठकीत सांगितले. त्यांनी याआधी अण्वस्त्रधारी रशियाबाबत अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन म्हणाले होते, की “आम्ही युक्रेनला दिलेला मोठा पाठिंबा, रशियाविरुद्धचा प्रचंड दबाव आणि या प्रयत्नांमध्ये असलेल्या 30 पेक्षा जास्त देशांबरोबरच्या एकजुटीचे खरे परिणाम आहेत. रशियाच्या युद्ध उद्दिष्टांचा विचार केला तर रशिया अपयशी ठरत आहे. युक्रेन यशस्वी होत आहे. रशियाचे मुख्य उद्दिष्ट आहे की युक्रेनवर पूर्ण मात करणे, त्याचे सार्वभौमत्व काढून घेणे, त्याचे स्वातंत्र्य काढून घेणे. मात्र यामध्ये रशिया अयशस्वी ठरला आहे.”
अमेरिका, नाटो आघाडीने रशिया हैराण..! केला ‘हा’ धक्कादायक आरोप; जाणून घ्या, युद्धाचे अपडेट..
बाब्बो.. ‘त्यामुळे’ वाढलेय जगाचे संरक्षण बजेट; पहा, अमेरिका, रशिया आणि भारताने किती केलाय खर्च..