Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Pune News Today: म्हणून चंद्रकांत पाटील, प्रकाश जावडेकरांनी हातात घेतला झाडू

Pune News Today: पुणे (Pune): पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या  वाढदिवसनिमित्त (Narendra Modi birthday) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash jawadekar) यांनी हातात झाडू घेऊन पुणे स्टेशन (Pune station) परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. तसेच पुणे शहरात एक हजार स्वच्छ्ता कार्यक्रम झाल्याची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City president Jagdish Mulik) यांनी दिली.

Loading...
Advertisement

आज सकाळी पुणे स्टेशन परिसरात महात्मा गांधी Mahatma Gandhi यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या अभियानाला प्रारंभ झाला. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार प्रकाश जावडेकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर स्टेशन परिसरात स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली. माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रभारी धीरज घाटे, सरचिटणीस राजेश येनपुरे, संदिप लोणकर, विशाल पवार, महेश पुंडे, मनीषा लड़कत, उमेश गायकवाड, तुषार पाटिल, विशाल कोंडे यावेळी उपस्थित होते. आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri missal) भीमराव तापकीर (Bhimrao tapkir), मुक्ता टिळक (Mukta Tilak), सुनील कांबळे (Sunil Kambale), सिद्धार्थ शिरोळे (Siddharth shirole) यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे पर्वती, खडकवासला, कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर मतदारसंघात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्थानिक पातळीवर माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (१७ सप्टेंबर) यांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत (२ ऑक्टोबर) शहराच्या विविध भागात स्वच्छ्ता मोहिम आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply