Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आज जाहीर होणार दहावीचा निकाल; ‘या’ ट्रिकचा वापर करून चेक करा सर्वात आधी

पुणे –  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज माध्यमिक शाळा दहावीच्या परीक्षेचा (10th Exam Results) निकाल जाहीर करणार आहे. दुपारी एक वाजता निकाल उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.

Advertisement

राज्य आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या सर्व COVID-19 सूचनांचे पालन करून ही परीक्षा घेण्यात आली. यावर्षी एसएससीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी एकूण 16,38,964 उमेदवारांनी नोंदणी केली होती, ज्यात 8,89,506 मुले आणि 7,49,458 मुलींचा समावेश होता.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर करेल. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी निकालाची तारीख आणि वेळ निश्चित केली आहे.

Advertisement

10वीचा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या mahahscboard.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल. या वेबसाइटवर जाऊन सर्वात आधी तूम्ही निकाल पाहू शकतात.

Advertisement

यावर्षी एसएससीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत राज्यात घेण्यात आली. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली – पहिली शिफ्ट सकाळी 10.30 ते 12.45 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 5.15 या वेळेत घेण्यात आली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply