Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

KKR च्या विजयाने प्लेऑफचे समीकरण बदलले; RCB च्या अडचणीत वाढ; जाणुन घ्या नवीन समीकरणे

पुणे-  श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) शनिवारी रात्री केन विल्यमसनच्या (Ken Williamson) सनरायझर्स हैदराबादवर (SRH) 54 धावांनी मोठा विजय नोंदवला.

Advertisement

यासह KKR गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोलकाताचा 13व्या सामन्यातील हा 6वा विजय आहे. दुसरीकडे या पराभवामुळे सनरायझर्स हैदराबादचे मोठे नुकसान झाले आहे. हैदराबादचा 12 व्या सामन्यातील हा 7 वा पराभव होता, उर्वरित दोन सामने जिंकूनही आता संघ KKR प्रमाणे केवळ 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जला 16 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. KKR विरुद्ध SRH सामन्यानंतर प्लेऑफचे समीकरण कसे बदलले ते जाणून घेऊया-

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादला केवळ 14 गुणच गाठता येतील

Advertisement

KKR विरुद्धच्या सामन्यापूर्वी, केन विल्यमसनच्या संघाला आशा होती की तो देखील या हंगामात 16 गुणांपर्यंत पोहोचेल. पण केकेआरने त्याचे सारे समीकरणच बिघडवले. या पराभवासह हैदराबादची 8व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. संघाला पुढील दोन सामने मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जविरुद्ध खेळायचे आहेत. या दोन्ही सामन्यात संघ जिंकला तरी केवळ 14 गुणांपर्यंत मजल मारता येईल. अशा स्थितीत केकेआरप्रमाणे त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे.

Loading...
Advertisement

आरसीबी, डीसी आणि पीबीकेएस यांच्यात टक्कर

Advertisement

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज हे तीन संघ आहेत ज्यांना अजूनही 16 गुणांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. आरसीबीला त्यांचा शेवटचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे, या सामन्यात संघाला मोठा विजय नोंदवायचा आहे कारण शेवटच्या सामन्यात नेट रन रेटवर स्क्रू अडकला तर आरसीबीच्या अडचणी वाढू शकतात. पंजाबविरुद्धच्या गेल्या सामन्यातील पराभवानंतर आरसीबीचा निव्वळ धावगती -0.323 वर पोहोचला आहे. दिल्लीचे दोन सामने आहेत, त्यापैकी एक त्यांना पंजाबविरुद्ध खेळायचा आहे. अशा स्थितीत या सामन्यातून काही चित्र स्पष्ट होईल की यापैकी कोणता संघ 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. दिल्लीला आणखी एक सामना मुंबईविरुद्ध तर पंजाबला शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे.

Advertisement

लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्ससाठी रस्ता सोपा आहे

Advertisement

लखनौ सुपर जायंट्स 16 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. संघाला पुढील दोनपैकी एक सामना जिंकावा लागेल आणि प्लेऑफसाठी पात्र ठरेल. दुसरीकडे, 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानच्या संघाला प्लेऑफमध्ये सहज पोहोचायचे असल्यास दोन्ही सामने जिंकावे लागतील. जरी संघाने एक सामना जिंकला तरी, प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे कारण त्यांचा नेट रनरेट उर्वरित संघांपेक्षा चांगला आहे. राजस्थानला पुढील दोन सामने लखनौ आणि चेन्नईविरुद्ध खेळायचे आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply