Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

युनिव्हर्स बॉसचा ‘तो’ मोठा विक्रम डेव्हिड वॉर्नरने केला ब्रेक; T- 20 मध्ये केला मोठा पराक्रम

पुणे – दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi capitals) डेव्हिड वॉर्नरने (David Warner) IPL 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) 58 चेंडूत 92 धावांची नाबाद खेळी खेळली होती. या खेळीत त्याने 12 चौकार आणि तीन षटकार मारले. या खेळीसह वॉर्नरने एक विक्रमही केला. तो T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. या प्रकरणात त्याने ख्रिस गेलचा (Chris Gayle) विक्रम मोडला.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

वॉर्नरचे दिल्लीविरुद्धचे अर्धशतक हे त्याचे T20 क्रिकेट इतिहासातील 89 वे अर्धशतक होते. गेलने आपल्या T20 कारकिर्दीत 88 अर्धशतके झळकावली आहेत. भारताचा विराट कोहली 77 अर्धशतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आणि पाकिस्तानचा शोएब मलिक 71 अर्धशतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये वॉर्नरच्या नावावरही अनेक विक्रम आहेत.

Loading...
Advertisement

वॉर्नर त्याआधी म्हणजेच 2021 च्या मोसमापर्यंत सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत होता. हैदराबादकडून खेळताना सलग सहा मोसमात 500 हून अधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये वॉर्नरच्या 158 सामन्यांमध्ये 42.06 च्या सरासरीने आणि 140.71 च्या स्ट्राइक रेटने 5762 धावा आहेत. यामध्ये 52 अर्धशतक आणि चार शतकांचा समावेश आहे.

Advertisement

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमावून 207 धावा केल्या. यामध्ये वॉर्नरच्या नाबाद 93 धावांव्यतिरिक्त रोव्हमन पॉवेलने मोलाचे योगदान दिले. रोव्हमनने 35 चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 67 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार ऋषभ पंतने 16 चेंडूत 26 धावांची खेळी केली.

Advertisement

प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत 8 गडी गमावून 186 धावाच करता आल्या. हैदराबादकडून यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनने सर्वाधिक 62 धावा केल्या. त्याने 34 चेंडूंच्या खेळीत दोन चौकार आणि सहा षटकार मारले. याशिवाय एडन मार्करामने 25 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 42 धावांची खेळी केली. अशा प्रकारे दिल्लीने हा सामना 21 धावांनी जिंकला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply