Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ प्रकरणात आयोगासमोर हजर राहणार शरद पवार; यापूर्वीही पाठवले होते समन्स

पुणे – कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील युद्ध स्मारकावर जानेवारी 2018 मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यांना 5 आणि 6 मे रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने यापूर्वी 2020 मध्ये पवारांना समन्स बजावले होते परंतु कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ते त्यापुढे हजर राहू शकले नाहीत.

Advertisement

नंतर पवारांना या वर्षी 23 आणि 24 फेब्रुवारीला आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले, परंतु ज्येष्ठ नेत्याने त्यांचे म्हणणे नोंदवण्यापूर्वी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करायचे असल्याचे सांगून नवीन तारखेची मागणी केली. नुकतेच प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

2018 मध्ये प्रतिज्ञापत्र दाखल 
त्यानंतर आयोगाने बुधवारी पवार यांना समन्स बजावल्याचे आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या प्रमुखांना 5 आणि 6 मे रोजी चौकशी आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
पवार यांनी 8 ऑक्टोबर 2018 रोजी आयोगासमोर प्रतिज्ञापत्रही दाखल केले होते.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

आयोगाचे सदस्य कोण आहेत?
फेब्रुवारी 2020 मध्ये, विवेक विचार मंच या सामाजिक गटाचे सदस्य सागर शिंदे यांनी 2018 च्या जातीय हिंसाचाराबद्दल पवारांनी प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या काही विधानांच्या पार्श्वभूमीवर त्यांना बोलावण्याची मागणी करणारा अर्ज आयोगासमोर दाखल केला. दोन सदस्यीय चौकशी आयोगात कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जेएन पटेल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांचा समावेश आहे.

Advertisement

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव-भीमाच्या 1818 च्या लढाईच्या 200 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील युद्ध स्मारकाजवळ वांशिक गटांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply