Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL मध्ये कोरोनाची एन्ट्री; DC vs PBKS सामन्यापूर्वीच समोर आली मोठी बातमी; आता..

पुणे- IPL 2022 मध्ये कोरोनाचा (Corona)प्रभाव दिसू लागला आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये (Delhi capitals) कोरोना संसर्गाची 5 प्रकरणे समोर आल्यानंतर बुधवारी पंजाब किंग्ज (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. आता हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमऐवजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाची आणखी नवीन प्रकरणे समोर येत नसल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याच्या ठिकाणी हा बदल दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचे पाच नवीन रुग्ण आढळल्यानंतर झाला आहे. 15 एप्रिल रोजी दिल्ली संघाचे फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. दुसऱ्या दिवशी टीमचा मसाज थेरपिस्ट चेतन कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.दोन दिवसांनी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन बॅट्समन मिचेल मार्शला व्हायरसची लागण झाली. त्याच दिवशी टीममधील आणखी दोन सदस्य डॉ. अभिजित साळवी आणि सोशल मीडिया मॅनेजर आकाश माने यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

दिल्ली कॅपिटल्समधील ज्या सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे ते आयसोलेशनमध्ये आहेत आणि डॉक्टर त्यांची काळजी घेत आहेत. आता सहाव्या आणि सातव्या दिवशी त्यांची चाचणी केली जाईल आणि दोन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते दिल्ली कॅपिटल्सच्या बायो-बबलमध्ये दाखल केले जातील. 16 एप्रिलपासून दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. आता बुधवारी म्हणजेच पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्याच्या दिवशी कोरोना चाचणीसाठी आरटी-पीसीआर चाचणी होईल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply