Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कर्मयोगीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील होणार चीतपट….वाचा इंदापूर तालुक्यात नेमकी काय आहे चर्चा…

आजपर्यंत एकहाती सत्ता राखणाऱ्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दत्तात्रय भरणे यांनी आस्मान दाखवत इंदापूर विधानसभा मतदार संघात आपले अस्तित्व सिध्द केले. मात्र आता कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखाना ताब्यात राखून अस्तित्वाच्या लढाईसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सज्ज झालेले आहेत.

पुणे : राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये चांगलाच संघर्ष सुरू आहे. त्यातच काँग्रेसमधून भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील यांच्या हाती असलेल्या कर्मयोगी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा बिगूल वाजला आहे. आजपर्यंत एकहाती सत्ता राखणाऱ्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दत्तात्रय भरणे यांनी आस्मान दाखवत इंदापूर विधानसभा मतदार संघात आपले अस्तित्व सिध्द केले. मात्र आता कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखाना ताब्यात राखून अस्तित्वाच्या लढाईसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सज्ज झालेले आहेत. मात्र या लढतीत मंत्री दत्तात्रय भरणे चमत्कार घडवणार की हर्षवर्धन पाटील सत्ता राखणार याबाबत चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

Advertisement

इंदापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्वाचा भाग असलेल्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. तर या निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्याने कर्मयोगीच्या सत्ताधाऱ्यांच्या पाचावर धारण बसली आहे. कारण सध्या कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी उभा केलेला साखर कारखाना वाईट अवस्थेतून जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कारखान्याच्या निवडणूकीत उतरावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Advertisement

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणूकीचे आजपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच 24 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे कारखान्याच्या स्थापनेपासून पाटील घराण्याकडे असलेला कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना आता दत्तात्रय भरणे हे हिसकावणार का? अशी चर्चा राज्यात रंगली आहे.

Loading...
Advertisement

गेल्या पाच वर्षापासून कारखान्याचे चेअरमन असलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या काळात कारखान्याची अधोगती सुरू झाल्याचे शेतकरी आणि कामगारांचे मत आहे. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर बील न मिळणे, कामगारांचे थकलेल वेतन, सभासद तसेच कामगारांच्या नावावर त्यांना न कळून येणारी कर्ज यासारख्या आरोपांनी कारखाना कायम नकारात्मकरित्या चर्चेत राहिला आहे. तर गेल्या निवडणूकीत इंदापूरचे आमदार असलेल्या भरणे यांनी कर्मयोगीच्या निवडणूकीत लक्ष न दिल्याने हर्षवर्धन पाटील यांनी एकहाती निवडणूक जिंकली होती. मात्र आता येत्या निवडणूकीत मंत्री दत्तात्रय भरणे यांचे मत कर्मयोगीच्या निवडणूकीत चमत्कार करेल, अशी चर्चा सुरू आहे.

Advertisement

उजनी बॅकवॉटर परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीकडे वळले आहेत. तसेच राज्यात सत्तेत असलेल्या दत्तात्रय भरणे यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहेत. तर सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आली तर कारखान्याला चांगले दिवस येतील आणि शेतकऱ्यांचे थकीत बीले, कामगारांचे वेतन यांचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे निवडणूकीत दत्तात्रय भरणे काय भुमिका घेणार यावर शेतकऱ्यांची आशा आहे. तर कारखान्याच्या मैदानात मंत्री भरणे यांची एंट्री झाली तर कर्मयोगी हातातून जाण्याची भीती हर्षवर्धन पाटील यांना सतावत आहे.

Advertisement
Advertisement

1 Comment
  1. Nitin says

    तुमचं इलेक्शन केलं तिकडं चुलीत आमची उसाची बिल द्या अगोदर बावड्यातील पाटलांनी कारखाना विकून घर चालवण्याची प्रथा चालू केली आहे अशा प्रकारची चर्चा सध्या तालुक्यात असते

Leave a Reply